मुंबई, 09 ऑगस्ट, 2022 : GOQii स्मार्ट व्हायटल यांच्यातर्फे कोटक महिंद्रा लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (KLI) आणि कोटक महिंद्रा जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (KGI) यांच्याशी हातमिळवणी केल्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्यातर्फे GOQiiच्या नव्या व विद्यमान ग्राहकांसाठी अनुक्रमे आयुर्विमा व आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात आहे.
GOQii स्मार्ट व्हायटल 2.0 वेअरेबल विकत घेणारे ग्राहक त्यांची क्रियाशील जीवनशैली व मासिक आरोग्य गुण (मंथली हेल्थ स्कोअर) यानुसार रु.5 लाखांपर्यंतच्या वैद्यकीय विम्यासाठी आणि रु. 1 लाखापर्यंतच्या आयुर्विम्यासाठी पात्र असणार आहेत. GOQii स्मार्ट व्हायटल हे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑरगनायझेशन (CDSCO) कडे नोंदणीकृत असे वैद्यकीय उपकरण आहे. युझर्सच्या जीवनावश्यक अवयवांची माहिती या उपकरणाच्या माध्यमातून मिळते. GOQii ecoसिस्टिमच्या माध्यमातून व्यक्तीला आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मार्गदर्शन करण्यात येत असून त्यांच्या आरोग्याची जोखीम कमी करण्यात येत आहे.
GOQii अॅप सक्रिय केल्यानंतर ही विमा योजना 12 महिन्यांपर्यंत वैध असेल. या विमा योजनेची मुदतसमाप्ती झाल्यानंतर ग्राहकाला त्यांच्या विम्याचे नूतनीकरण करायचे असेल तर त्यांना GOQii अॅपमधून GOQii पर्सनल केअर सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण करावे लागेल. विमा संरक्षण सक्रिय करण्यासाठी ग्राहकाला GOQii अॅप डाऊनलोड करून GOQii अॅपमध्ये साइनअप/अॅक्टिव्हेशन प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल.
GOQii चे संस्थापक व सीईओ विशाल गोंडल म्हणाले, “प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या क्षेत्रात क्रांतिकारी तंत्रज्ञान आणण्यात आम्ही अग्रणी आहोत. आमच्या निष्पत्तीवर आधारित आरोग्य विम्यासह आम्ही मूलभूत आरोग्यसेवेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहोत. या संदर्भात आम्ही गेल्या सात वर्षांमध्ये माहिती गोळा केली आहे. कोटक महिंद्राच्या सहयोगाने आमच्या युझर्सना विमा संरक्षण उपलब्ध करून देताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत.”
कोटक महिंद्रा लाइफ इन्श्युरन्स कं. लि.चे एमडी आणि सीईओ महेश बालसुब्रमण्यन म्हणाले, “कोटकमध्ये आम्ही नेहमी ग्राहकांच्या हितावर भर देतो आणि GOQii शी भागीदरी करणे हा आमच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या पुढाकाराचा भाग आहे. पर्सनल वेलनेस प्लॅनच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या विम्याचा तपशील GOQii अॅपमध्ये पाहू शकतील आणि त्यांनी केलेल्या आरोग्यदायी अॅक्टिव्हिटीच्या माहितीच्या आधारे त्यांच्या वेलनेसवरही लक्ष ठेवू शकतील.”
कोटक महिंद्रा जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुरेश अगरवाल म्हणाले, “ग्राहकांना चांगले आरोग्य राखण्यासाठी व आरोग्यदायी सवयी अंगी बाणविण्याचे आणि त्याच वेळी त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण देने या कराराचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱया स्मार्ट लाभदायी कल्पनांशी को-ब्रँडिंग करण्याच्या कोटक ग्रुपच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”