नवी मुंबई : नवी मुंबईत सानपाडा येथील सीताराम मास्तर उद्यानातील गार्डन समूहाच्या सहकार्याने स्थानिक मा. नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर यांनी ९ ऑगस्ट २०२२ रोजी गायत्री चेतना केंद्र येथे उत्तम आरोग्यासाठी ” तूच आहे तुझ्या आरोग्याचा शिल्पकार “आणि ” आयुर्वेद ही काळाची गरज ” आहे असे स्पष्टपणे सांगणारे मार्गदर्शक उत्तम महादू भोर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यास सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक व रहिवासी यांनी चांगला प्रतिसाद दिला. उत्तम भोर यांनी सदर व्याखनाच्या माध्यमातून कान, डोळे, नाक, ऱ्हदयविकार,मुतखडा, पोटाचे विकार, फुफुस, यकृत, किडनी इत्यादी अवयावर होणारे आजार व त्यावर आयुर्वेदिक उपाय काय करायचे, याबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले,
गायत्री चेतना केंद्राचे अध्यक्ष मुन्नाभाई पटेल यांचे नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमास सहकार्य मिळते, त्यामुळे त्यांचा व शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, तसेच याप्रसंगी गार्डन समूहाच्या वतीने सानपाडा विभागातील नागरिकांसाठी सातत्याने उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करणारे मा. नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर यांचा सपत्नीक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी यानिमित्ताने घरा- घरावर तिरंगा लावण्यासाठी शंभर झेंड्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणवीर पाटील यांनी उत्तम केले तर आभार शिवसेनेचे शाखाप्रमुख अजय पवार यांनी मानले.