मुंबई, ११ ऑगस्ट २०२२ – भारतातर्फे १४ ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या दुःस्मृती जागवल्या जातात. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीचे चटके सोसलेल्या लाखो लोकांच्या स्मरणार्थ ‘पार्टिशन हॉरर्स रिम्बेबरन्स डे’ (फाळणी स्मरण दिन) साजरा केला जातो. फाळणीचे अगणित दुष्परिणाम सोसलेल्यांच्या वेदना समोर आणण्यासाठी या दिवसाचे आयोजन करत गेल्या शतकात मोठ्या प्रमाणावर निर्वासित झालेल्यांची आठवण या निमित्ताने देशाला करून दिली जाते.
फाळणीची वेदना मांडणारे सचित्र प्रदर्शन इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (आयसीएचआर) आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (आयडीएनसीए) यांनी संयुक्तपणे आयोजित केले असून ते १० ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान ते सार्वजनिक ठिकाणी पाहाण्यासाठी जनतेला खुले असेल. बीपीसीएलने इतर ऑइल मार्केटिंग पीएसयूसह हे प्रदर्शन आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली असून कंपनीने किमान प्रत्येक जिल्ह्यातील एका फ्युएल स्टेशनवर ते पाहायला मिळेल याची काळजी घेतली आहे. बीपीसीएलने १८२ फ्युएल स्टेशन्सवर हे प्रदर्शन भरवले आहे.
या प्रदर्शनांचे उद्घाटन स्वातंत्र्यसैनिक, मान्यवर ज्येष्ठ नागरिक आणि सार्वजनिक प्रतिनिधींद्वारे करण्यात आले.