मुंबई दि, ९ (प्रतिनिधी) : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या भारतातील लहान व्यावसायिक वाहने (एससीव्ही) बनविणाऱ्या अग्रगण्य कंपनीने आज ‘नवीन जीतो प्लस सीएनजी ४००’ सादर करीत असल्याची घोषणा केली. इंधन कार्यक्षमता आणि मायलेज यांमध्ये नवीन मानके प्रस्थापित करणाऱ्या विद्यमान जीतो प्लस या श्रेणीत हे नवीन वाहन कंपनीने सादर केले आहे.
‘नवीन जीतो प्लस सीएनजी ४००’ या वाहनाची एका दमात ४०० किलोमीटरपर्यंत जाण्याची क्षमता आहे, तसेच या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट असे ३५.१ किमी प्रति किलो इतके मायलेज ते देते. ६५० किलोचा, या उद्योगातील सर्वोत्तम इतका, भार वाहून नेण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळेच ‘नवीन जीतो प्लस सीएनजी ४००’ हे मॉडेल नफ्यातील वाढ आणि ग्राहकांची समृद्धी करणे यांकरीता आदर्श ठरते.
‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ची किंमत ५.२६ लाख रुपये इतकी स्पर्धात्मक ठेवण्यात आलेली आहे. अखेरच्या टप्प्यापर्यंत वितरण करण्यासाठी आणि वाहतूकदारांच्या लॉजिस्टिक्सविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे वाहन खास विकसित करण्यात आले आहे. अनेक उल्लेखनीय वैशिष्ट्यांनी हे वाहन सुसज्ज आहे. अखेरच्या टप्प्यापर्यत वाहतूक करणाऱ्या भारतभरातील लहान व मध्यम स्वरुपातील व्यावसायिक आणि व्यापारी यांच्या गरजांसाठी हे अगदी योग्य आहे.
‘महिंद्रा ऑटोमोटिव्ह एससीव्ही’ विभागाचे व्यवसाय प्रमुख अमित सागर म्हणाले, “एससीव्हीच्या बाजारपेठेत महिंद्रा दोन दशकांहून अधिक काळ आघाडीवर आहे. आम्ही वाहतूक व्यवसायातील वाढती आव्हाने समजून घेतो आणि आमच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांनुसार योग्य ते उपाय देण्याचा सतत प्रयत्न करतो. मला विश्वास आहे की, ‘महिंद्राच्या’ इतर उत्पादनांप्रमाणेच, ‘नवीन जीतो प्लस सीएनजी चारशे’ ही गाडी सीएनजी वाहनांसाठी नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करील. आमचे ग्राहक आता या गाडीतून लांबवरचा प्रवास करू शकतील, तसेच सारख्या रिफिलिंगची काळजी न करता शहरांतर्गत मालवाहतूकही करू शकतील. आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्यवसायात भरभराट होण्यास ही गाडी मदत करेल, कारण त्यांच्या विशिष्ट आवश्यकतांसाठी तिच्यामध्ये उत्कृष्ट अनुकूलता आहे.”