सणाच्या हंगामाची सुरुवात करणारा हा महिना पुन्हा आला आहे, जिथे देशभरातील कुटुंबे रक्षाबंधनाचा बहुप्रतिक्षित सण साजरा करण्याची तयारी करतात. भावंडांमधील बंधाचा आदर करण्यासाठी, ‘राखी’ बांधणे हे भावंडांचे एकमेकांवर असलेल्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे आणि या प्रसंगाची वाट पाहत एकमेकांना अनमोल भेटवस्तू देऊन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. सणाची तयारी जोरात सुरू असताना, भेटवस्तूंचा सखोल विचार करण्याची हीच वेळ आहे. या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या प्रियजनांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती लक्षात घेऊन, त्यांची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आरोग्याने भरलेला बॉक्स – बदामांनी भरलेला बॉक्स त्यांना भेट देऊन आपले प्रेमाचे नाते मजबूत करूया !
बदाम हे उत्तम आरोग्याची देणगी आहे कारण प्रत्येक मूठभर (30g). बदाम मध्ये प्रथिने (6 ग्रॅम), फायबर (4 ग्रॅम), ” चांगली ” चरबी (9.5 ग्रॅम), व्हिटॅमिन ई (7.7mg), कॅल्शियम (81mg), मॅग्नेशियम (81mg) यांसारख्या मुख्य पोषक तत्वांचा स्रोत आहेत. मधुमेह व्यवस्थापन, वजन व्यवस्थापन, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि इतर आरोग्य समस्यांसाठी बदाम फायदेशीर असल्याचे अनेक संशोधन अभ्यासांनी सिद्ध केले आहे. ते वनस्पती-आधारित प्रथिनांचे एक ऊर्जा देणारे स्त्रोत आहेत आणि ते दीर्घकाळ तृप्त ठेवू शकतात. बदाम स्वादिष्ट आणि निरोगी, असू शकतात आणि विविध प्रकारे सर्व्ह केले जाऊ शकतात – जसे साधे, भाजलेले किंवा चवीनुसार किंवा अगदी रेसिपीमधील घटक म्हणून. या सुकामेव्या मुळे मिळणाऱ्या आरोग्यविषयक फायद्यांमुळे बदाम आपल्या भावंडांसाठी या रक्षाबंधनाला एक उत्तम भेटवस्तू बनवतात.
सणासुदीच्या काळात बदामाला भेटवस्तू देणारा आरोग्यदायी पर्याय म्हणून सेलिब्रेटी फिटनेस इंस्ट्रक्टर आणि ट्रेनर यास्मिन कराचीवाला म्हणाल्या, “जेव्हा सणासुदीचा प्रश्न येतो, तेव्हा मिठाई आणि सुक्या मेव्याची देवाणघेवाण ही एक सामान्य भावना असते. तथापि, निरोगी राहण्यासाठी, प्रत्येक स्तरावर विचारपूर्वक निवड करणे महत्वाचे आहे. म्हणून, या रक्षाबंधनाला, काही साखरयुक्त किंवा जास्त उष्मांक, कमी पौष्टिक मिठाई देण्या ऐवजी, मी तुम्हाला भावंडांसोबत वेगवेगळ्या बदामाचा बॉक्स देण्याची शिफारस करते . बदाम केवळ निरोगी आणि आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण नसतात, तर हा सुकामेवा तृप्त करणारा देखील असतो, कारण त्यामध्ये वनस्पती प्रथिने, फायबर आणि ” चांगली ” चरबी असते. अशा पौष्टिक निवडी करून आपण आपल्या आरोग्यासाठी दीर्घकाळापर्यंत अनेक प्रकारे फायदा मिळवू शकतो.”
इंटिग्रेटिव्ह न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ कोच, नेहा रंगलानी म्हणाल्या, “या रक्षाबंधनाला, भूतकाळातील शिकलेल्या गोष्टींचा चांगला उपयोग करून घेणे आणि निरोगी सणासुदीची सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या भावंडाना भेटवस्तू देताना मी मिठाई आणि चॉकलेट्सऐवजी कच्चे, भाजलेले, हलके खारवलेले किंवा चवीचे बदाम देण्याची शिफारस करेन. बदाम हे पौष्टिकाचे भांडार म्हणून ओळखले जातात, जे त्यांना एक चवदार आणि निरोगी नाश्ता बनवतात जे दिवसभरात कधीही खाल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, बदाम हे झिंकचे स्त्रोत आहेत जे रोगप्रतिकारक शक्तीच्या वाढ, विकास आणि देखभालमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
मॅक्स हेल्थकेअर – दिल्लीच्या प्रादेशिक प्रमुख-डायटेटिक्स, रितिका समद्दार म्हणाल्या, “बदाम हे सण आणि विशेष प्रसंगी पारंपारिकपणे एक शुभ भेट म्हणून ओळखले जाते. बदाम भेट देणे हे चांगले आरोग्य भेट देण्याचे लक्षण आहे कारण ते भेटवस्तू देणार्याची काळजी आणि चिंता दर्शवते. बदाम भेटवस्तू म्हणून हा एक उत्कृष्ट पर्याय आहे कारण ते केवळ पौष्टिक आणि स्वादिष्ट स्नॅक म्हणून काम करत नाहीत, तर ती भेट म्हणून देण्याची भावना स्वतःच आपल्या प्रियजनांच्या एकूण आरोग्यामध्ये एखाद्याच्या स्वारस्याचे प्रतिनिधित्व आहे. बदाम हे व्हिटॅमिन ई, आहारातील फायबर आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांचा स्त्रोत आहे. दररोज मूठभर बदाम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यात आणि रक्तातील साखरेची पातळी अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होते, असे अभ्यास देखील समर्थन करतात. म्हणून, या रक्षाबंधनाला, मी प्रत्येकाला भेटवस्तू निवडीबद्दल जागरूक राहून आणि तुमच्या भावंडांना बदामाची एक पेटी भेट म्हणून देण्याची शिफारस करते.”
न्यूट्रिशन आणि वेलनेस कन्सल्टंट शीला कृष्णस्वामी, म्हणाल्या, “रक्षाबंधन हा उत्सव, समारंभ, खरेदी आणि अर्थातच स्नॅक्स आणि मिठाईच्या अतिसेवनाने भरलेला असतो. या सणासुदीच्या हंगामात, मी तुम्हाला तुमच्या भेटवस्तूंचे मूल्यमापन आणि पुनर्विचार करण्याची विनंती करेन. मिठाई किंवा तळलेल्या पदार्थांऐवजी, आपल्या भावंडांना बदाम भेटवस्तू म्हणून द्या कारण ती एक विचारपूर्वक भेटवस्तू होते , जी दीर्घकाळापर्यंत त्यांच्या आरोग्यामध्ये भर घालेल. याशिवाय, बदाम हे व्हिटॅमिन B2 किंवा रिबोफ्लेविनचे समृद्ध स्त्रोत आहेत, हे जीवनसत्व ऊर्जा उत्पादन आणि अन्नाचे इंधनात रूपांतरित करण्याच्या भूमिकेसाठी ओळखले जाते, ज्यामुळे बदाम जाता जाता एक उत्साहवर्धक नाश्ता बनतो!”