मुंबई : (सुजित धाडवे) महाराष्ट्रातील गडकोट किल्ले पर्यटन स्थळ बनले आहेत असले तरी त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. यांच विचारातून दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी गडकिल्ले स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जेजुरी आषाढी वारी वारकरी दिंडीचे औचित्य साधुन जेजुरी मल्हार गड येथे स्वच्छता करण्यात आली.
याद्वारे प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील एका गडाला भेट देऊन शिवविचारांचे आणि गड -किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी गडावर माझा गड माझा अभिमान अशी स्वच्छता मोहीम राबवून आलेल्या पर्यटकांमध्ये गड स्वच्छतेविषयी जनजागृती करीत आहेत.दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे,वर्षा चासकर, अशोक खांडेकर, आरती सुलगेवार ,जानवी हेमंत एडवणकर, अमृता काशिद,योगेश अशोक गायकवाड, स्वाती मोरे, सचिन वाघ पाटील, यश खंदारे, अविष्कार यादव, गोविंद संजय सुर्यवंशी,अमित पवार, स्वप्नाली वारंगे,युवराज पाटील,राजेंद्र पोतदार ,अतिश मोहिते, पूनम अतिश मोहिते,त्रिशा अतिश मोहिते, विकास लोहोट,अखिलेश अनंत वारंगे,अपर्णा अनंत वारंगे,अनंत महादू वारंगे, साक्षी चव्हाण यांच्यासह २४ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी जेजुरी पायथा मल्हारगड येथे स्वच्छता मोहीम राबवली, यामोहिमेविषयी माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष जयकांत शिंक्रे यांनी सांगितले की तरुण मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याबरोबरच त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा असलेले किल्ले स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही गडावर स्वच्छता करतो. पर्यटकांकडून किल्ल्याच्या परिसरात टाकलेल्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या खाऊचे पुडे, इत्यादी जमा झालेला कचरा गोळा करून गडावरून खाली घेऊन त्यांची विल्हेवाट लावत असल्याचे जयकांत शिंक्रे यांनी सांगितले.