मुंबई : चंद्रपूर मधील आश्रम शाळा एका तेरा वर्षे विद्यार्थ्यांनी अत्याचार(rape of girl in ashram school of Chandrapur) झाल्याच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर भंडारा येथे एका 35 वर्षीय महिलेवर वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार(Gang-rape in Bhandara) केला. राज्य महिला आयोगाने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. ही प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याने प्रकरणी तातडीने कार्यवाही करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा असे आदेशच राज्य महिला आयोगाने दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) भंडारा येथील पीडित महिलेची भेट घेतली. यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत संताप व्यक्त केला आहे.
भंडारा येथील घटना
भंडारा येथील कनहाडमोह गावाजवळ 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिला गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी असल्याचे चाकणकर म्हणाल्या. या प्रकरणात तीन आरोपी होते त्यापैकी दोन आरोपी अटक करण्यात आहे. रुपाली चाकणकर यांनी या महिलेची भेट घेतली. आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे. लाखनी पोलीस स्टेशन मध्ये पीडित महिला गेली तेव्हा ती व्यवस्थित माहिती देऊ शकली नाही कारण ती घाबरली होती. मात्र, ती महिला त्या पोलीस स्टेशन मधून निघून गेली हे सगळं सीसीटीव्ही मध्ये दिसते आहे. यामध्ये पोलिसांचा हलगर्जी पणा आहे यामध्ये तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलेला आहे चौथा पोलीस रजेवर होते पण त्यांची ट्रान्सफर करण्यात आली असल्याचे चाकणकर यांनी सांगीतले.
चंद्रपूर मधील आश्रम शाळेतीवल अत्याचार प्रकरण
चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती तालुक्यातील आश्रमशाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. भद्रावती तालुक्यातील बरांज तांडा येथील गमाबाई निवासी आश्रम शाळेची ही विद्यार्थिनी आहे. पिडीतेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून हिंगणघाट शहरात राहतात. मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने डायरेक्ट मुलीचा दाखला देत तिला घरी घेऊन जाण्याची सूचना तिच्या पालकांना केली. मात्र, यानंतर मुलीने अत्याचाराबाबत आपल्या पालकांना सांगीतले. यानंतर पालकांनी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी झाली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी कलम 376 व पोक्सो अंतर्गत आश्रमशाळेचे अधीक्षक संजय एकनाथ इटनकर यास अटक केली आहे. राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२(३) नुसार प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याने तातडीने कार्यवाही करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गृहमंत्रालायसमोर मांडणार
राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीक बनला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या या सगळ्या घटना गृहमंत्रालाया समोर मांडणार असून महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात या सरकारने लक्ष घालावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगीतले.