मुंबई, 16 जानेवारी: अमृत नोनीने आपले प्रमुख उत्पादन असलेल्या अमृत नोनी ऑर्थो प्लससाठी मानवी क्लिनिकल चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. औषध क्लिनिकल चाचण्यांसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अत्यंत काटेकोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार नालंदा क्लिनसर्व्हच्या सहकार्याने आयोजित या चाचणीतून ग्राहकांना उच्च-गुणवत्तेसह प्रभावी उपाय प्रदान करण्याच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला आहे. अमृत नोनीने आयुर्वेदिक औषधांसाठी गाठलेला हा टप्पा संधीवाताने ग्रस्त असलेल्यांच्या वेदना व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या यशस्वी क्लिनिकल चाचणीनंतर बेंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना, व्हॅल्यू प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. श्रीनिवासमूर्थी म्हणाले, या उत्पादनातून संधिवातासाठी नाविन्यपूर्ण उपचारांच्या निकडीची गरज अधोरेखित झाली आहे. भारतातील २१० दशलक्षाहून अधिक लोकसंख्येतील जवळजवळ १५% लोकसंख्या संधीवाताने प्रभावित आहे. ज्यामध्ये ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात असे १०० हून अधिक प्रकार समाविष्ट आहेत. ही व्याधी कर्करोग, एचआयव्ही एड्स आणि मधुमेहापेक्षा अधिक सामान्य आहे. तणाव आणि व्यस्त जीवनशैलीतील बदलांमुळे संधिवात तरुणांसाठी देखील वेदनादायी समस्या बनत आहे. या व्याधीवर पूर्ण उपचार नसला तरी, सुरक्षित आणि अधिक प्रभावी व्यवस्थापनातून वेदना कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो.
गेल्या १५ वर्षांपासून, अमृत नोनी हे उत्पादन आयुर्वेदिक औषधांमध्ये विश्वासार्ह नाव बनले आहे. या अद्ययावत क्लिनिकल चाचणीतून दुहेरी अभ्यासाद्वारे, ऑस्टियोआर्थरायटिस, रूमेटॉइड आर्थरायटिस आणि गाउट सारख्या परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी अमृत नोनी ऑर्थो प्लसने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविली आहे.
सकारात्मक परिणामांसह अद्वितीय सूत्रीकरण
उत्पादनातील प्रगत संशोधन आणि विकासावर प्रकाश टाकताना ओमश्री मार्केटिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती मंगलम्बिके म्हणाल्या, “अनुभवी, निष्णात आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधकांच्या सहकार्याने विकसित केलेले अमृत नोनी ऑर्थो प्लस, सांधेदुखी व्यवस्थापनासाठी भारतातील सर्वाधिक विक्री होणारे उत्पादन म्हणून उदयास आले आहे. देशातील ३० लाखांहून अधिक ग्राहकांना अमृत नोनीच्या ऑर्थो प्लसमधील अद्वितीय आणि प्रभावी गुणधर्मामुळे गुडघेदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळाला आहे.”
अमृत नोनीने यापूर्वीही अमृत नोनी डी प्लससाठी कठोर निकषावर आधारित वैज्ञानिक संशोधनातून यशस्वी केलेल्या क्लिनिकल चाचणीतून आपले समर्पण सिद्ध केले आहे. या उत्पादनाने कॅन्सी-केअरसह कर्करोगाच्या पेशींवर वैज्ञानिक शास्त्रिय अभ्यास पूर्ण केला आहे.
यावेळी पत्रकारांशी साधलेल्या संवादात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. संदीप बेनाकल आणि डॉ. महंतस्वामी हिरेमठ यांनी या या यशस्वी क्लिनिकल चाचणी आणि संशोधनाचे कौतुक केले. पारंपारिक आयुर्वेदिक चिकित्सेची अत्याधुनिक वैज्ञानिक प्रमाणीकरणाची सांगड घालून अमृत नोनी आयुर्वेदिक आरोग्यसेवेत बेंचमार्क स्थापित करत असल्याचे समाधान यातून व्यक्त झाले.
क्लिनिकल चाचणीचे ठळक मुद्दे
नालंदा क्लिनसर्व्ह येथील क्लिनिकल रिसर्च प्रमुख डॉ. के. वेंकटेश्वरालू, यांनी या मानवी क्लिनिकल चाचणीबद्दल सविस्तर माहिती दिली. ऑस्टियोआर्थरायटिस, रूमेटॉइड आर्थरायटिस आणि गाउट या प्रत्येक आजारासाठी ४० रुग्णांचा या अभ्यासासाठी समावेश करण्यात आला होता. हा अभ्यास सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला. रुग्णांना सक्रिय आणि प्लेसिबो गटांमध्ये विभागण्यात आले. दोन महिन्यांच्या अंतराने त्यांचे मूल्यांकन करण्यात आले.
असे निघाले प्रमुख निष्कर्ष
१. ऑस्टियोआर्थरायटिस: प्लेसिबो गटाच्या तुलनेत सक्रिय गटात वेदना, गतिशीलता, रक्तातील कॅल्शियम, मॅग्नेशियम पातळी आणि हाडांच्या खनिज घनतेमध्ये लक्षणीय सुधारणा.
२. संधिवात: सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (CRP), रूमेटॉइड फॅक्टर (RA फॅक्टर) आणि ESR मध्ये लक्षणीय घट, सीरम इम्युनोग्लोबुलिन पातळी आणि अँटीन्यूक्लियर अँटीबॉडी (ANA) पातळीत सुधारणा.
३. गाउट: असह्य वेदना आणि जळजळीतून रुग्णांची मुक्ती. वेदना व्यवस्थापनामुळे जीवन मानाची गुणवत्ता सुधारली. शिवाय मूत्रपिंड आणि यकृतासारख्या अवयवांवरील संभाव्य दुष्परिणाम टाळता आले.
पत्रकार परिषदेत बोलताना, ओमश्री मार्केटिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ नारायण आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. संदीप बेनाकल यांनी या यशस्वी संशोधनाचे कौतुक केले.