प्राईस बँड प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी ११७ ते १२४ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
- अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली/ऑफर गुरुवार, १६ जानेवारी २०२५ रोजी खुली होईल.
- ही बोली/ऑफर शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी खुली होईल आणि मंगळवार, २१ जानेवारी २०२५ रोजी बंद होईल.
- कमीत कमी १००० इक्विटी समभागांसाठी बोली लावता येईल आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास १००० च्या पटीत बोली लावावी लागेल.
MUMBAI : ईएमए पार्टनर्स इंडिया लिमिटेड आयपीओमार्फत ७६ कोटी रुपयांपर्यंत भांडवल उभारणी करण्यासाठी सज्ज आहे. हे इक्विटी समभाग एनएसईच्या इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी खुला होईल आणि मंगळवार, २१ जानेवारी २०२५ रोजी बंद होईल. याचा प्राईस बँड ११७ ते १२४ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जे भांडवल उभे राहील त्याचा उपयोग लीडरशिप टीम उभारणीसाठी, आयटी पायाभूत सोयीसुविधा अपग्रेड करण्यासाठी, कर्ज परतफेडीसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे व अधिग्रहणांसाठी करण्यात येईल.
या आयपीओमध्ये ५३,३४,००० पर्यंत इक्विटी शेयर्स फ्रेश इश्यू अर्थात नव्याने जारी केलेले असतील, ज्यांचे एकूण मूल्य ६६.१४ कोटी रुपयांपर्यंत असेल आणि प्रमोटर कृष्णन सुदर्शन व सुब्रमण्यन कृष्णप्रकाश आणि एक पब्लिक शेयरहोल्डर शेखर गणपती यांच्याकडून ७,९६,००० पर्यंत शेयर्स विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येत आहेत.
ईएमए पार्टनर्स इंडिया लिमिटेड ही एक आघाडीची एक्झिक्युटिव्ह सर्च कंपनी विविध क्षेत्रातील ग्राहकांना कस्टमाइज्ड लीडरशिप हायरिंग सोल्युशन्स प्रदान करते. या कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी अनेक बिझनेस व फंक्शनल लीडर्सची भरती केली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे संचालनातून मिळणारे उत्पन्न आणि करपश्चात नफा अनुक्रमे ६७.२९ कोटी रुपये आणि १४.२७ कोटी रुपये होता.
ईएमए पार्टनर्सचा मुख्य भर भारत, मध्य पूर्व आणि सिंगापूरमध्ये सी सूट आणि बोर्ड लेवल पदांवर भरती करण्यावर असतो. या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये असून चेन्नई, गुरगाव आणि बंगलोरमध्ये देखील कार्यालये आहेत. जागतिक प्रतिभा आणि ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने सप्टेंबर २०१० मध्ये सिंगापूरमध्ये ईएमए पार्टनर्स सिंगापूर पीटीई लिमिटेड ही उपकंपनी स्थापन करून दक्षिण पूर्व आशियामध्ये कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर कंपनीने मध्य पूर्वेमध्ये वृद्धी संधींचा लाभ घेण्यासाठी दोन उपकंपन्या सुरु केल्या – ईएमए पार्टनर्स एक्झिक्युटिव्ह सर्च लिमिटेड (दुबई), मार्च २०१७ मध्ये आणि जेम्स डग्लस प्रोफेशनल सर्च लिमिटेड (दुबई) जुलै २०२२ मध्ये.
या इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर इंडोरिएंट फायनान्शियल सर्व्हिसेस आणि रजिस्ट्रार बिगशेयर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत.