हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमा 24 जानेवारीला रीलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज रीलीज झाला आहे. निवेदिता सराफ, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आदी कलाकार मंडळी या सिनेमात दिसणार आहे. एका सामान्य कुटुंबातील भावड्यांची कहाणी या सिनेमात खुमासदार अंदाजात मांडली आहे. सध्या या चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ आणि दिस सरले ही दोन गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत.