NHI NEWS AGENCY/ REPORTER/ ANAGHA SAKPAL
मुंबई: माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या एकमेव मान्यता प्राप्त को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आंतर सहकारी बँक कॅरम आणि बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धा २५ व २६ जानेवारी रोजी दादर-पश्चिम येथील युनियनच्या कार्यालय परिसरात होणार आहे.
को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई संलग्नीत सहकारी बँकांमधील महाराष्ट्र राज्यातील कॅरम व बुध्दिबळ खेळाडूंसाठी ही स्पर्धा मर्यादित आहे. दोन्ही स्पर्धा बाद पध्दतीने होणार आहेत. कॅरम स्पर्धा महिला एकेरी व दुहेरी आणि पुरुष एकेरी व दुहेरी अशा एकूण चार गटात होणार आहे. बुध्दिबळ स्पर्धा महिला व पुरुष अशा एकूण दोन गटात होईल. प्रत्येक गटातील विजेत्या व उपविजेत्यांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक देऊन अध्यक्ष आनंदराव अडसूळ व माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी युनियन कार्यालय ( दूरध्वनी: २४३७ १७५५), ८१/८३ शालिनी पॅलेस, भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम, मुंबई-२८ येथे १० जानेवारीपर्यंत संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, जनार्दन मोरे, धर्मराज मुंढे आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.