NHI NEWS AGENCY/ REPORTER/MRUNALI SAKPAL
१०,००० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन सामुदायिक एकतेचे प्रदर्शन केले
मुंबई, : उच्च गुणवत्तापूर्ण स्थावर मालमत्ता संपत्तींचे आघाडीचे जागतिक विकासक आणि संचालक ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजने रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या सहयोगाने आज बहुप्रतीक्षित पवई रन २०२५ चे यशस्वी आयोजन केले. ब्रूकफील्ड प्रॉपर्टीज आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्स यांच्यातील सहयोगाचे हे सलग चौथे वर्ष असून पवई रन २०२५ ची ही १४ वी आवृत्ती आहे. तब्बल १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींनी यामध्ये भाग घेऊन आरोग्य, एकता, परोपकार यांना प्रोत्साहन दिले, पवईतील सामुदायिक भावना आणि उत्साह अजून जास्त मजबूत केला.
१ जानेवारी रोजी सायंकाळी ‘रॉक अँड रन सत्संग’ ने आयोजित केलेल्या भावपूर्ण संगीत कार्यक्रमाने समुदायातील सदस्यांदरम्यानचे बंध अधिक दृढ केली. ४ जानेवारी रोजी पवईतील हाऊस ऑफ मँडरिन मध्ये पार पडलेल्या ‘कार्बोहायड्रेट लोडींग ऍक्टिविटी’ मध्ये प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट मैत्रेयी बोकील यांनी एका संवादात्मक सत्रामध्ये योग्य पोषणाद्वारे कामगिरी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मौल्यवान टिप्स दिल्या.
मुख्य कार्यक्रमामध्ये ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजच्या लीडरशिप टीमने डाऊनटाऊन पवई येथे हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये ब्रूकफील्डचे एशिया पॅसिफिक क्षेत्राचे रिअल इस्टेट हेड आणि मॅनेजिंग पार्टनर श्री अंकुर गुप्ता, भारतामध्ये ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजचे अंकित गुप्ता, भारतामध्ये ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजच्या मार्केटिंग आणि की अकाउंट मॅनेजमेंटच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट रीमा एच. कुंदनानी, भारतामध्ये ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट, ऑपरेशन्स (वेस्ट) श्री अतुल तेंडुलकर, हीरानंदानी ग्रुप ऑफ़ कंपनीजचे एमडी श्री निरंजन हीरानंदानी आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या प्रेसिडेंट पालवी अगरवाल हे सहभागी झाले होते.
“आय रन फॉर आयआयटी-बी” उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. पवईला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देणाऱ्या आयआयटी बॉम्बेसोबत सामुदायिक ऐक्य हा उपक्रम दर्शवतो. आयआयटी-बीमधील सध्याचे आणि माजी विद्यार्थी अशा एकूण १००० युवकांनी यामध्ये भाग घेतला व सौहार्द भावनेला प्रोत्साहन देत पवईच्या समृद्ध वारशाचा आनंद साजरा केला. आयआयटी-बॉम्बेच्या स्टुडन्ट अफेयर्सचे डीन डॉ सूर्यनारायण डूला यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाला प्रतीकात्मक व प्रेरणादायी स्पर्श दिला.
मुख्य कार्यक्रमामध्ये दोन प्रकार होते – ४ किमी आणि १० किमी. सी-सूट एक्झिक्युटिव्ह आणि आयआयटी-बीचे माजी विद्यार्थी यांच्यासाठी विशेष लाउंजची व्यवस्था केलेली असल्याने प्रोफेशनल्स आणि लीडर्स यांच्यादरम्यान अर्थपूर्ण संवादाला वाव मिळाला.
ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजमधील टेनंट्स, जसे की, डेलॉइट, ऍप्टीया, टीआयएए, स्कॉर्पिओ मरीन मॅनेजमेंट इंडिया आणि एर्गो टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस यांनी देखील यामध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतला. ब्रूकफील्ड इंडिया आरईआयटी पोर्टफोलिओमधील एक स्ट्रॅटेजिक पार्टनर, जीआयसीमधील लीडर्स तसेच इतर मोठमोठ्या कॉर्पोरेट्स, ब्रूकफील्ड ग्रुप कंपन्यांचे कर्मचारी आणि आयपीसी कम्युनिटीमधील सदस्य यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवला.
ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजच्या सीनियर व्हाईस प्रेसिडेंट – मार्केटिंग आणि की अकाउंट मॅनेजमेंट, रीमा एच. कुंदनानी म्हणाल्या, “पवई रन २०२५ समुदायाची आणि समन्वयाची शक्ती दर्शवणारा उपक्रम आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्ससोबत आमच्या भागीदारीचे हे चौथे वर्ष आहे, यामध्ये आम्हाला भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही पवईतील रहिवासी आणि आमचे टेनंट्स, भागीदार व सहभागी झालेल्यांचे आभारी आहोत. आमच्या पोर्टफोलिओतील एक धोरणात्मक संपत्ती असलेल्या डाऊनटाऊन पवईमध्ये या उपक्रमाचे आयोजन करून आम्ही ज्या समुदायांसोबत काम करतो त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याप्रती आमची वचनबद्धता आम्ही दर्शवली आहे.”
रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या प्रेसिडेंट, पालवी अगरवाल यांनी सांगितले, “समुदायाला जोडणारा आणि सर्वंकष कल्याणाला प्रोत्साहन देत अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देणारा पवई रन २०२५ हा एक अतुलनीय मंच आहे. या कार्यक्रमाची पोहोच आणि प्रभाव वाढवण्यात ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याने खूप मोलाची भूमिका निभावली आहे. यातून उभारण्यात आलेला निधी अशा उपक्रमांसाठी वापरला जाईल, ज्यामुळे लोकांच्या जीवनात ठोस बदल घडून येतात. अशाप्रकारे आम्ही समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहोत.”
पवई रन २०२५ समुदायाच्या सहभागातून आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची आणि एकतेची शक्ती दर्शवतो. ब्रूकफील्ड प्रॉपर्टीज आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्स हे अशा प्रकारचे प्रभावी कार्यक्रम आयोजित करून, पवई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बांधील आहेत.