NHI NEWS AGENCY/ REPORTER/ ANAGHA SAKPAL
मुंबई, : डाबर इंडिया लिमिटेडचा भारतातील नंबर १ एअर फ्रेशनिंग ब्रँड ओडोनिलने आपली १० वर्षे जुनी मोहीम जस्मिन भसीन सोबत पुन्हा तयार केली आहे. या नवीन मोहिमेद्वारे ब्रँडने नवीन वर्षाच्या निमित्ताने जुन्या मोहिमेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
या मोहिमेने भूतकाळातील संस्मरणीय आठवणींना नव्या अवतारात सादर केले आहे. ही नवीन मोहीम ग्राहकांना पुन्हा त्याच साधेपणाच्या युगात घेऊन जाते. सुमारे १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली मूळ टीव्हीसी तिच्या विनोदी मांडणीमुळे लोकप्रिय झाली होती. एखाद्याच्या बाथरूममध्ये ओडोनिल नसल्याने होणारी संभाव्य सामाजिक अडचण यात विनोदी पद्धतीने मांडण्यात आली होती.
जस्मिन भसीनसोबत चित्रित केलेल्या या टीव्हीसीची खूप चर्चा झाली. जाहिरातीत ती नवीन भारतीय वधूच्या रूपात एका सोफ्यावर बसलेली असून तिच्या लग्नाशी संबंधित तक्रारी कॅमेरासमोर व्यक्त करत आहे. बाथरूममध्ये ओडोनिलची कमतरता ही तिची सर्वात मोठी तक्रार आहे. या स्थिती आणि वर्गाबद्दल अतिशय मनोरंजक पद्धतीने ती चिंता व्यक्त करते.
याच धर्तीवर ओडोनिलची नवीन मोहीम ओडोनिलने बाथरूमचा अनुभव वाढवण्यात आणि एखाद्याच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्याच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आहे.
डाबर इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग हेड-होमकेअर, श्री वैभव राठी म्हणाले, “ओडोनिलची नवीन मोहीम सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, जी जास्मिन भसीनसोबत शूट केलेल्या १० वर्ष जुन्या टीव्हीसीची आठवण करून देते. ही मोहीम पुन्हा तयार करून आम्ही प्रेक्षकांना त्या जुन्या काळाशी जोडू इच्छितो, तेही पूर्णपणे नवीन अवतारात. जुन्या टीव्हीसीच्या आठवणींना उजाळा देऊन आम्हाला प्रेक्षकांशी आमचे नाते आणखी घट्ट करायचे आहे. या मोहिमेत जस्मिन तिच्या खास शैलीत प्रेक्षकांना सांगते की ओडोनिल बाथरूमला दीर्घकाळ सुगंधित ठेवते.
सोशियोक्लाउटचे सीआरओ श्री अभिलाष सिंग म्हणाले, “ओडोनिलची नवीन मोहीम सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ओडोनिल बाथरुम फ्रॅग्रन्स वापरण्यास सोपे आहेत आणि दुर्गंधी दूर करून झटपट सुगंध देतात. ही नवीन मोहीम सुगंधप्रेमी ग्राहकांना आकर्षित करेल आणि ओडोनिल त्यांचे बाथरूम आणि त्यांचे जग पूर्णपणे बदलू शकते याची आठवण करून देईल.”