भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी सुश्री तनिषा मुखर्जी आणि प्रख्यात योग प्रशिक्षक, सुश्री बोस्की त्रिपाठी यांनी सौंदर्य स्पर्धेचे परिक्षक म्हणून विजेत्या श्रीमती राणी लोकेगावकर यांना गौरवले
लोणावळा, : लोणावळा महिला फाउंडेशनने महाराष्ट्रातील हिल स्टेशनवर “लोणावळा गॉट टॅलेंट – गो व्होकल फॉर लोकल” कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. हिल स्टेशनसाठी पहिली सौंदर्य स्पर्धा “मिसेस लोणावळा २०२४” सुरू केली. याशिवाय स्थानिक सपर्धकांच्या पाककलेच्या कौशल्याला व्यासपीठ मिळावे यासाठी “फूड फेस्टिव्हल” चे आयोजन करण्यात आले होते. तसेच उत्साहात भर टाकण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसहित सर्व वयोगटांसाठी, “समूह नृत्य स्पर्धे” चे आयोजन केले गेले. या स्पर्धेत स्थानिक नृत्यगटांनी आपल्या नृत्यकौशल्याने मंच गाजवला.
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री तनिशा मुखर्जी आणि योग प्रशिक्षक बॉस्की त्रिपाठी यांची उपस्थिती. या दोन यशस्वी महिलांनी सौंदर्य स्पर्धा व नृत्य स्पर्धेच्या परीक्षक मंडळाचे नेतृत्व केले आणि विजेत्यांचा मुकुट घालून सन्मान केला.
मिसेस लोणावळा २०२४ ही स्पर्धा फाउंडेशनच्या स्थानिक महिलांच्या आत्मविश्वास, सौंदर्य आणि सशक्तीकरणाचे प्रतीक आहे. विवाहित महिलांच्या कर्तृत्वाला आणि सौंदर्याच्या नवीन संकल्पनांना मान्यता देत या स्पर्धेला स्थानिक लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सर्व फेऱ्याअंती “मिसेस राणी लोकेगावकार” यांनी मिसेस लोणावळा २०२४ चा मान पटकावला तर “मिसेस अनुसया शेट्टी” यांनी प्रथम उपविजेतेपद व “मिसेस स्नेहल पाटील” यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळवले.
मिसेस लोणावळा सीनियर सिटीझन २०२४ या श्रेणीत ज्येष्ठ सहभागींच्या सौंदर्य आणि कर्तृत्वाला गौरवण्यात आले, ज्यामध्ये मिसेस शोभा मंधारे यांनी विजेतेपद मिळवले. मिसेस सरोज गोयल यांना प्रथम उपविजेत्या म्हणून घोषित करण्यात आले, तर मिसेस हेमलता अग्रवाल यांना दुसऱ्या उपविजेत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अत्युत्कृष्ट महिलांसाठी विशेष श्रेणी देखील होती ज्याद्वारे असामान्य योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले, ज्यात मिसेस “ज्योती रंगाणे” यांना त्यांच्या प्रेरणादायी कर्तृत्वासाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मिस लोणावळा २०२४ या श्रेणीत, “लब्धी लालवाणी” यांनी आपल्या आकर्षक भूमिका आणि आत्मविश्वासाने विजेतेपद पटकावले.
भारतीय अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी तनिशा मुखर्जी यांनी म्हटले, “लोणावळा महिला फाउंडेशनच्या या उपक्रमाने महिलांना त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्याची व त्यांचे अनोखेपण साजरे करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले हे पाहून मला खूप आनंद झाला. मिसेस लोणावळा स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा आणि फूड फेस्टिवलचा साक्षीदार होणे माझ्यासाठी खरचं सन्मानाचे होते. तसेच प्रत्येक सहभागी इथे विजेता आहे.”
प्रसिद्ध योग प्रशिक्षक बॉस्की त्रिपाठी म्हणाल्या, “लोणावळा महिला फाउंडेशनचा स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोणावळा गॉट टॅलेंट’ व्यासपीठ निर्माण करण्याचा उपक्रम मला खूप प्रेरणादायी वाटला. मिसेस लोणावळा सौंदर्यस्पर्धा ही महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास मार्गदर्शन करते. सहभागी महिलांना माझा संदेश आहे की, आपल्या प्रवासाला संतुलन, स्थिरता आणि सकारात्मकतेच्या मार्गदर्शनाने पुढे न्या. तुम्ही सर्व स्वतःला यात सहभागी करून घेऊन आधीच विजयी झाल्या आहात.”
लोणावळा महिला फाउंडेशनच्या संस्थापक सौ. ब्रिंदा गणात्रा म्हणाल्या, “व्होकल फॉर लोकल” हे आमचे ब्रीदवाक्य आहे आणि लोणावळा महिला फाउंडेशन, स्थानिक महिलांना त्यांचे कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम वचनबध्द आहोत. मिसेस लोणावळा सौंदर्यस्पर्धा केवळ सौंदर्याचा उत्सव नसून, महिलांच्या आत्मविश्वास, धैर्य आणि वेगळेपणाचा सन्मान आहे. प्रत्येक सहभागीने दाखवले आहे की, एक महिला होणे म्हणजे प्रत्येक भूमिका आत्मविश्वासाने आणि आदरपूर्वक निभावणे होय. तनिशा मुखर्जी आणि बॉस्की त्रिपाठी यांचे प्रेरणादायी समर्थन आणि उपस्थितीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.