NHI NEWS AGENCY/ REPORTER/ ANAGHA
मुंबई : भारतातील अग्रगण्य जीवन विमा प्रदात्यांपैकी एक, आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (“ABSLI”), त्याच्या व्यापकपणे प्रसारित आणि कौतुक झालेल्या #BoodheHokeKyaBanoge मोहिमेचा एक भाग म्हणून एक रोमांचक ऑन-ग्राउंड उपक्रमाचे आयोजन केले आहे. या इव्हेंटमध्ये सहभागींना त्यांचे सेल्फी अपलोड करण्याची, त्यांच्या निवृत्तीनंतरच्या भविष्याची झलक पाहण्याची आणि त्यांच्या स्वप्नातील सेवानिवृत्तीच्या व्यवसायात स्वतःला पाहण्याची संधी दिली.
नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासह सेवानिवृत्तीच्या आकांक्षा जीवनात आणणे: कार्यक्रमातील सहभागींना त्यांच्या भविष्यातील स्वतःची कल्पना करण्यात मदत करते. एक कलाकार, उद्योजक किंवा प्रवासी म्हणून सेवानिवृत्ती कशी असू शकते हे दाखवण्यासाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान चेहऱ्याच्या परिवर्तन तंत्राचा वापर करते. यासाठी निवडण्यात आलेल्या सहभागींनी त्यांच्या बदललेल्या प्रतिमा बिलबोर्डवर थेट प्रदर्शित केल्या, ज्यामुळे एक अविस्मरणीय अनुभव निर्माण झाला.
या उपक्रमामुळे मोहिमेच्या प्रमुख संदेशाला बळ दिले: व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्ती योजनांचा पुनर्विचार करण्यास आणि त्यांच्या सुवर्ण वर्षांची पूर्तता तसेच उद्दिष्टांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने कल्पना करण्यास प्रोत्साहित करणे. अर्थपूर्ण कथाकथनासह सर्जनशीलतेचे मिश्रण करून, ABSLI प्रेक्षकांना निवृत्तीचे नियोजन हे स्व चा शोध आणि आनंदाचा प्रवास म्हणून पाहण्यासाठी प्रेरित करते.
कंपनीच्या अनोख्या मोहिमेनंतर निवृत्तीवरील संभाषणांना उधाण: #BoodheHokeKyaBanoge मोहीम बालपणीच्या “बडे होके क्या बनोगे?” (मोठे झाल्यावर काय बनणार?) या परिचित प्रश्नाचा पुन्हा अनुभव देते. आणि हाच प्रश्न कालांतराने “आप बुढे होके क्या बनोगे?” (तुम्ही तुमच्या म्हातारपणी काय बनणार?), यात परावर्तित होतो. या कथेद्वारे, ABSLI लोकांना सेवानिवृत्ती नंतरच्या बचतीच्या पारंपरिक कल्पनेच्या पलीकडे विचार करण्यास तसेच आर्थिक सक्षमतेसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित करते.
हे ऑन-ग्राउंड ॲक्टिव्हेशन टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अन्य जाहिरातींच्या विस्तृत मल्टीमीडिया मोहिमेला पूरक आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला परस्परसंवादी सहभागाची जोड देऊन, ABSLI भारतातील सेवानिवृत्ती नियोजन पुनर्परिभाषित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करते.
हायफन ब्रँड ही क्रिएटिव्ह एजन्सी आहे आणि हा कार्यक्रम प्लॅटिनम आउटडोअरने यशस्वी केला.