स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्साय बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक उडीला 8 जुलै रोजी 112 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा संपन्न झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.