नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत औरंगाबादमध्ये शिंदे गटातील आमदारांनी आपापला गड राखत शिवसेनेला धक्का दिला. औरंगाबाद महापालिका निवडणुका भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र औरंगाबाद महापालिकेत वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेनेनं आता तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेचे आमदार आणि महानगरप्रमुख असलेल्या प्रदीप जैस्वाल यांच्या जागी एकेकाळचे भाजप नेते किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आलीये. ते टक्कर देणार आहेत आमदार प्रदीप जैस्वाल यांना….!
मुंबई : एमआयएमने 2014 साली ज्या दोन विधानसभा मतदारसंघात खातं उघडलं, त्यात इम्तियाज जलील यांचा औरंगाबाद मध्य हा मतदारसंघही होता. इथे अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव शिवसेनेच्या पदरी पडला, ज्याचा बदला उद्धव ठाकरेंनी २०१९ ला घेतला. पण या मतदारसंघाच्या आमदाराने बंडखोरी केली आणि शिवसेनेला धक्का दिला. याच आमदाराविरोधात उद्धव ठाकरेंनी मोहिम उघडलीय, त्यांच्या जागी नवी नियुक्ती जाहीर केलीय आणि एकेकाळी भाजपात असलेल्या नेत्यालाच मैदानात उतरवलंय. एकीकडे एमआयएम आणि दुसरीकडे बंडखोरी हे दुहेरी आव्हान असलेल्या या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी कशी फिल्डिंग लावलीय वाचा….