NHI NEWS AGENCY )REPORTER/ ANAGHA SAKPAL
मुंबई:राष्ट्रीय मिल मजदूर संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे संस्थापक स्व. गं.द. आंबेकर यांच्या स्मृतीदिन-सप्ताहानिमित्त कामगारांच्या मुलामुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा स्विस लीग पध्दतीने रंगणार आहे.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेमधील प्रत्येक वयोगटातील पहिल्या १० मुलांना व ५ मुलींना गुणानुक्रमे एकूण १२० पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व खजिनदार निवृत्ती देसाई यांनी दिली. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. प्रत्येक साखळी फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे ३ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.
******************************