NHI NEWS AGENCY REPORTER ANAGHA
मुंबई कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा १० ते १२ डिसेंबर दरम्यान परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे संस्थापक स्व. गं.द. आंबेकर यांच्या स्मृतीदिन-सप्ताहानिमित्त कामगारांच्या मुलामुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने चम्पियन कॅरम बोर्डावर विनाशुल्क कॅरम स्पर्धा भरविण्यात येणार आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते यांनी दिली.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने होणारी स्पर्धा १६ वर्षाखालील मुलामुलींचा शालेय गट आणि १९ वर्षाखालील मुलामुलींचा कॉलेज गट अशा दोन गटात रंगणार आहे. नवोदित व उदयोन्मुख ज्युनियर खेळाडूंना स्पर्धेदरम्यान तज्ञ मंडळींचे मोफत मार्गदर्शन देखील लाभणार आहे. सहभागी होणाऱ्या परगांवच्या डीएसओ जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर आदी पदाधिकारी विशेष प्रयत्नशील आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी प्रवेश अर्ज अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे १ डिसेंबरपर्यंत संपर्क साधावा.
******************************