NHI NEWS AGENCY REPORTER ANAGHA SANTOSH
मुंबई: गेली तीन दशके सर जे.जे. हॉस्पिटल क्रिकेट संघातून रुग्णालयीन क्रिकेट क्षेत्र गाजविणारे अष्टपैलू चंद्रकांत उर्फ दाजी नाईक हे वयपरत्वे जे.जे. हॉस्पिटल या नामांकित शासकीय रुग्णालयीन ३५ वर्ष सेवेतून ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकांत नाईक यांनी सेवा कारकिर्दीत वेळेचे व कामाचे काटेकोर पालन आणि क्रिकेटच्या मैदानावर दमदार फलंदाजी व शिताफीने यष्टिरक्षण करण्याचे ध्येय उराशी बाळगल्यामुळे हसतखेळत यशस्वीपणे सेवानिवृत्तीला सामोरे जात असल्याची समाधानी भावना व्यक्त केली.
सर जे. जे. हॉस्पिटल सेवेत सन १९८९ मध्ये रुजू झालेल्या चंद्रकांत नाईक यांनी सर जे.जे. रुग्णालयीन क्रिकेट संघात सलामीचा फलंदाज व यष्टीरक्षक असा नावारुपाचा खेळ केला. त्यांच्या नेतृत्वाखाली जे.जे. हॉस्पिटल क्रिकेट संघाने रुग्णालयीन क्रिकेट क्षेत्रातील प्रतिष्ठेची गिरनार क्रिकेट स्पर्धा जिंकली. गिरनार क्रिकेट स्पर्धेमध्ये तीन शतके ठोकणाऱ्या सलामीवीर चंद्रकांत नाईक यांचे शिवाजी पार्क मैदानावरील नाबाद द्विशतक अवघ्या दोन धावांनी केवळ संघाचे सर्व खेळाडू बाद झाल्यामुळे हुकले. २५ वर्षाहून अधिक काळात टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा, गिरनार क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्र शासनाची थळे शिल्ड क्रिकेट स्पर्धा, कांगा लीग क्रिकेट स्पर्धा, आयडियल रुग्णालयीन टी-२० क्रिकेट स्पर्धा आदी स्पर्धा गाजविताना वैयक्तिक पुरस्कारांची देखील लयलूट केली. दाजी या टोपण नावाने टेनिस क्रिकेट विश्वात धडाकेबाज फलंदाजीसाठी ते सुपरिचित ठरले. ***********************