८३.६ % स्टॉक ब्रोकर्स २०२४-२५ मध्ये त्यांचे आयटी बजेट वाढविण्याची योजना आखत आहेत. त्यापैकी ४१.८टक्के ब्रोकरने २० टक्के वाढिचे लक्ष्य ठेवले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), अल्गोरिथम ट्रेडिंग आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील गुंतवणुकीवर भर
सुरक्षा, सरलता आणि स्केलेबिलिटी यासारख्या पैलूंवर लक्ष केंद्रित करणे हे देखील त्याचे उद्दीष्ट आहे.
NHI NEWS AGENCY/REPORTER/ANAGHA SAKPAL
मुंबई, : स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रातील ८३.६% स्टॉक ब्रोकर्सने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यांचे आयटी बजेट वाढवण्याची योजना आखली आहे. त्यापैकी ४१.८ टक्के ब्रोकर्सने २० टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय स्टॉक ब्रोकर्सची संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया वेस्टर्न रीजन (एएनएमआय डब्ल्यूआयआरसी), आज त्यांच्या वार्षिक स्टॉकटेक २०२४-२५ सर्वेक्षण अहवालाची घोषणा केली. या अहवालामध्ये स्टॉक ब्रोकर्सच्या तंत्रज्ञानातील गुंतवणुकीविषयी महत्त्वपूर्ण निष्कर्ष दिले आहेत.
सर्व्हेनुसार, ८३.६% स्टॉक ब्रोकर्सची २०२४-२५ मध्ये त्यांच्या आयटी बजेटमध्ये वाढ करण्याची योजना आहे. यामध्ये ४१.८% ब्रोकर्स २०% किंवा त्यापेक्षा जास्त वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश सुरक्षा, सोपेपणा आणि स्केलेबिलिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आहे. त्यात अल्गोरिदमिक ट्रेडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश आहे.
सर्वेक्षणातील आणखी काही ठळक मुद्दे:
तंत्रज्ञानातील गुंतवणूक: ३४.३% स्टॉक ब्रोकर्स भविष्यवाणी विश्लेषण आणि वैयक्तिकृत ट्रेडिंगसाठी एआय आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाला प्राधान्य देत आहेत.
ऑटोमेशन आणि स्केलेबिलिटी: ३२.९% ब्रोकर्स अचूकता आणि ऑटोमेशनसाठी अल्गोरिदमिक ट्रेडिंगवर लक्ष केंद्रित करत आहेत.
ब्लॉकचेन: ७.१% ब्रोकर्स पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी ब्लॉकचेनचा वापर करत आहेत.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बाबत, ६०% पेक्षा जास्त स्टॉक ब्रोकर्स त्यांच्या व्यवसाय प्रक्रियेचे ५०% पेक्षा जास्त डिजिटायझेशन करण्यासाठी सक्रिय आहेत. या आधुनिकीकरणामुळे उद्योग अधिक कार्यक्षम होईल.
सुरक्षा आणि साधेपणा: सुरक्षा बाबत ८४.८% ब्रोकर्स महत्त्वपूर्ण धोरणे अंगिकारत आहेत. यामध्ये सायबर सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनाचे जास्त महत्त्व दिले गेले आहे. याच वेळी, ९०.९% ब्रोकर्स ग्राहकांच्या अनुभवाला सुधारण्यासाठी साधेपणाला प्राधान्य देत आहेत.
सेबीचे कार्यकारी संचालक श्री व्ही. एस. सुंदरेशन म्हणाले, “स्टॉकटेक सर्वेक्षण २०२४-२५ भारताच्या भांडवली बाजारात तंत्रज्ञानातील परिवर्तन क्षमता अधोरेखित करते. स्टॉकब्रोकर्स एआय, ब्लॉकचेन आणि अल्गोरिथम ट्रेडिंगमधील गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याने सेबी नाविन्यपूर्ण, पारदर्शकता आणि गुंतवणूकदार संरक्षणाचे वातावरण वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे. हा उद्योग जोखीम व्यवस्थापन आराखड्यासह उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करून बाजारातील भागीदारांच्या हितांचे रक्षण करीत शाश्वत विकास साध्य करू शकतो.
एएनएमआयचे अध्यक्ष हरिन मेहता यांनी स्टॉकटेक २०२४-२५ च्या संदर्भात सांगितले की, “तंत्रज्ञानातील सुधारणा आणि डिजिटल जगाच्या बदलत्या आवश्यकतांमुळे, भारताचा स्टॉकब्रोकिंग उद्योग लवचिक आणि सर्वसमावेशक बनत आहे. एएनएमआय या क्षेत्रातील वाढीव लवचिकता आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध असून, त्या दृष्टीने काम करत राहील.”
स्टॉक टेक २०२४-२५ इव्हेंटमध्ये “सुरक्षा, सोपेपणा आणि स्केलेबिलिटी” या थीमवर फिनटेक कंपन्या, दलाल आणि उद्योग विचारवंत एकत्र आले आणि त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा केली, जे भारताच्या भांडवली बाजाराची गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.