तीन कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे तिसरे वर्ष साजरे
या वर्षी १००० विजेत्यांमध्ये मुंबईतील ४२ सन्मानितांची विक्रमी संख्या
NHI NEWS AGENCY/REPORTER ANAGHA SANTOSH
मुंबई, : आरआर काबेल या भारतातील इलेक्ट्रिकल वस्तू, वायर आणि केबल उत्पादक कंपनीने मुंबईतील आपल्या काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रमात २०२४च्या विजेत्यांची घोषणा केली. या उद्योगात असा शिष्यवृत्तीचा उपक्रम प्रथमच घेण्यात येत आहे. इलेक्ट्रिशियन्सच्या ज्या मुलांनी यंदा १०वीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली, त्यांना ही शिष्यवृत्ती या वर्षी देण्यात येत आहे. ‘आरआर काबेल’च्या ‘सुशिक्षित आणि सशक्त भारत’ या संकल्पनेशी जुळवून घेणाऱ्या या उपक्रमामध्ये होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना साह्य देण्यासाठी दरवर्षी १ कोटीहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात येते. देशभरात आत्तापर्यंत प्रत्येकी १०,००० रुपयांच्या वैयक्तिक शिष्यवृत्तीसाठी ३००० विद्यार्थ्यांना निवडण्यात आले आहे. या गुणवंतांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी केवळ आर्थिक पाठबळच मिळवले नाही, तर आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊलदेखील उचलले आहे.
आरआर काबेल कंपनीच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाली असून यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर केलेले आहेत. देशभरातील सुमारे १००० शिष्यवृत्ती विजेत्यांपैकी ४२ विजेते हे एकट्या महाराष्ट्रातून निवडण्यात आले आहेत. मुंबईतील ‘आर ओडियन मॉल’मधील ‘आर स्क्वेअर फूड’ येथील ‘ला बॅंक’ या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
काबेल स्टार्स स्कॉलरशिप हा आरआर काबेलचा उपक्रम २०२२ मध्ये सुरू करण्यात आला. देशभरातील इलेक्ट्रिशियन्सना कंपनीतर्फे ‘काबेल दोस्त’ म्हणून संबोधण्यात येते. या ‘काबेल दोस्तां’च्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पाठिंबा देऊन सक्षम बनवण्याच्या दृष्टीकोनातून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. ही योजना सुरू झाल्यापासून तिचा मोठा परिवर्तनात्मक प्रभाव पडला आहे. देशभरातील पात्र विद्यार्थ्यांना तिच्यातून आर्थिक मदत मिळाली आहे. वर्षानुवर्षे हा उपक्रम प्रमाण आणि महत्त्व या दोन्ही पातळ्यांवर वाढला आहे. प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. यंदा ‘काबेल स्टार्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम’ची तिसरी आवृत्ती सुरू आहे. इलेक्ट्रिशियन समुदायाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या भावी पिढ्यांसाठी गुंतवणूक करण्यास ‘आरआर काबेल’ कटिबद्ध आहे. शिष्यवृत्ती उपक्रमाने मुलांसाठी नवीन शैक्षणिक संधी खुल्या केल्या आहेत, त्यांना आपल्या आर्थिक अडचणींचा विचार न करता शैक्षणिक आकांक्षा जोपासण्यास सक्षम केले आहे. साहजिकच दरवर्षी अर्जदारांच्या संख्येत वाढ होत आहे. ही शिष्यवृत्ती घेऊन शैक्षणिक स्तर उंचावण्य़ासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि आपल्या मनातील करिअरचा पाठपुरावा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा प्रेरणादाय़ी ठरत आहेत.
शिष्यवृत्ती उपक्रम सुरू करण्याची दूरदृष्टी बाळगणाऱ्या व त्याकरीता पुढाकार घेणाऱ्या ‘आरआर ग्लोबल’च्या संचालिका कीर्ती काबरा म्हणाल्या, “आमचे इलेक्ट्रिशियन, ज्यांना आम्ही प्रेमाने ‘काबेल दोस्त’ म्हणून ओळखतो, ते ‘आरआर काबेल’चा अविभाज्य भाग आहेत. आम्ही नेहमीच व्यवसायाच्या पलिकडचा विचार करतो आणि त्यातूनच या ‘काबेल दोस्तां’च्या जीवनात अर्थपूर्ण परिवर्तन घडविण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. त्यांच्या मुलांच्या भवितव्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला ‘आरआर काबेल स्टार स्कॉलरशिप’ कार्यक्रम मूर्त स्वरूप देत आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, पार्श्वभूमीचा किंवा आर्थिक अडचणींचा विचार न करता, स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची संधी प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला मिळाली पाहिजे. ती आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून मिळवून देत आहोत. आरआर काबेलमध्ये आम्ही असे भविष्य घडवत आहोत जिथे प्रतिभेला सीमा नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न उत्तुंग भरारी घेऊ शकेल.”
पारितोषिके मिळाल्यानंतर शिष्यवृत्ती विजेते विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना अतीव आनंद झाला व त्यांनी मोठा जल्लोष केला. विजेत्यांच्या पालकांसाठी हा भावनिक आणि अभिमानाचा क्षण होता. या विजेत्यांची चिकाटी आणि समर्पण याविषयीच्या कथा खरोखरच प्रेरणादायी होत्या. निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे या समारंभात कौतुक करण्यात आले. त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी ‘आरआर काबेल’चा उपक्रम त्यांना एक ठोस व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
‘काबेल स्टार्स स्कॉलरशिप’ उपक्रम हा ‘आरआर काबेल’चा समाजाचे ऋण फेडण्याचा आणि पुढच्या पिढीसाठी उज्वल, अधिक सुशिक्षित भविष्य घडवण्यासाठीचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक मार्गावर वाटचाल करीत असताना, आरआर काबेल कंपनी इलेक्ट्रिशियन्स आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आकांक्षांना खतपाणी घालत आहे आणि त्यांनी मिळवलेल्या यशाचा उत्सव साजरा करीत आहे; तसेच उद्याच्या या नेत्यांना घडवण्यात मदत करीत आहे.