रील लाइफ हीरो सोनू सूदकडून खऱ्याखुऱ्या आयुष्यातील नायकांचा गौरव
मुंबई, : डॉ. बत्रा’ज® च्या बजाज ऑटोचे सहाय्य लाभलेल्या पॉझिटिव्ह हेल्थ पुरस्कारांचे १६वे पर्व हा टाटा थिएटर, एनसीपीए मुंबई इथे पार पडलेला व प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे सूत्रसंचालन लाभलेला एक आगळावेगळा आणि नवा पायंडा पाडणारा उपक्रम ठरला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये गंभीर आजारांवर आणि अपंगत्वावर विजय मिळविलेल्या आणि हे करताना समाजालाही सक्रिय योगदान देत असलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.
मान्यवर परीक्षक मंडळामध्ये राजीव बजाज – एमडी, बजाज ऑटो, पद्मश्रीने सन्मानित डॉ. मुकेश बत्रा डॉ. बत्रा’ज® ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक, श्रीम. मनेका संजय गांधी, विवेक ऑबेरॉय आणि आर. बल्की यांचा समावेश होता. देशभरातून आलेल्या शेकडो प्रवेशपत्रिकांमधून विजेत्यांची निवड करण्याचे कठीण काम त्यांनी पार पाडले.
विविध क्षेत्रांतील १००० हून अधिक अग्रगण्य व्यक्तींनी आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सन्माननीय पाहुण्यांमध्ये बु अब्दुल्ला ग्रुप (यूएई)चे अध्यक्ष डॉ. बु अब्दुल्ला यांचाही समावेश होता, जे दुबईवरून खास या कार्यक्रमासाठी आले होते.
दृष्टीची समस्या असलेल्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘स्वररंग’ या सांगितिक कार्यक्रमाने आणि बेंगळुरूच्या पाशा डान्स ग्रुपने व्हीलचेअर्सवर सादर केलेल्या कथक व भरतनाट्यम नृत्यप्रकारांचा मिलाफ घडविणाऱ्या सादरीकरणातून प्रेक्षकांना संगीत-नृत्याचा एक मनोवेधक अनुभव मिळाला.
या प्रसंगी बोलताना डॉ. बत्रा’ज® ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “आजारावर यशस्वीपणे मात केलेल्या इतर रुग्णांकडूनच इतर रुग्णांसाठी प्रेरणा मिळत असते असे मला खात्रीपूर्वक वाटते. पॉझिटिव्ह हेल्थ हीरोज हे आजारपणातून जाणाऱ्या लक्षावधी लोकांचे प्रेरणास्त्रोत आहेत. होमियोपथीच्या सुरक्षित विज्ञानाचा वापर करणारा एक गुणकारी ब्रॅण्ड म्हणून अशा नायकांच्या असामान्य कहाण्या सर्वांसमोर आणत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या कहाण्या म्हणजे त्यांच्या आत्मबलाची मूर्तीमंत उदाहरणे आहेत. श्री. राजीव बजाज आणि आमच्या प्रायोजकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.”
या प्रसंगी बोलताना अभिनेता व लोकोपयोगी कार्य करणारे सोनू सूद म्हणाले, “डॉ. बत्रा’ज® फाउंडेशन दिव्यांग व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन एक थोर काम करत आहे. त्यांच्या कहाण्या खरोखरीच प्रेरणादायी आहेत आणि इतरांसाठी अनुकरणीय आदर्श ठरणारी आहेत. डॉ. बत्रा’ज® ने होमियोपॅथी – या औषधोपचारांच्या एका सुरक्षित पद्धतीच्या माध्यमातून लोकांना बरे करण्याचे चांगले काम केले आहे, त्याचे मी कौतुक करतो.”
बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज म्हणाले, “माझा होमियोपॅथीच्या विज्ञानावर गाढ विश्वास आहे आणि मी त्याचा हिरीरीने पुरस्कारही करत असतो, कारण या पद्धतीची बरे करण्याची ताकद मी प्रत्यक्ष पाहिली आहे. डॉ. बत्रा यांनी या पद्धतीचे आधुनिकीकरण केले आहे व ती जगापर्यंत पोहोचवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बत्रा’ज® पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सबरोबर सहयोग साधत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या असाधारण मंचाच्या माध्यमातून भारतातील आपल्या दिव्यांग बंधू-भगिनींना पाठिंबा देणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.”
४ लाखांहून अधिक मते मिळविणाऱ्या सत्यम यांना पीपल्स चॉइस पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित करण्यात आले, तर सुवर्णा राज यांना ३ लाखांहून अधिक मते मिळाली आणि आनंद अरनॉल्ड यांना २ लाखांहून अधिक मते मिळाली.
प्रत्येक पुरस्कारविजेत्याला एक प्रमाणपत्र व ‘पॉझिटिव्ह हेल्थ हीरोज २०२४’ म्हणून त्यांचे नाव असलेला चषक देण्यात आला तसेच या जगाला अधिक चांगले ठिकाण बनविण्याच्या त्यांच्या वाटचालीला सहाय्य म्हणून एक लाख रुपयांचा धनादेशही त्यांना देण्यात आला.