NHI NEWS AGENCY/ REPORTER/ ANAGHA SAKPAL
‘Bingo!’ आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनतर्फे भारतात प्रथमच 12 ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान वर्ल्ड पिकलबॉल चॅम्पियनशिपचे आयोजन
मुंबई, : ‘Bingo!’ हा ITC फूड्सचा लोकप्रिय स्नॅकिंग ब्रँड, भारतात पिकलबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनसोबत पाच वर्षांची भागीदारी जाहीर करताना उत्साहित आहे. ‘Bingo! वर्ल्ड पिकलबॉल चॅम्पियनशिप’च्या (डब्ल्यूपीसी) आयोजनाने या ऐतिहासिक भागीदारीची सुरुवात होणार आहे. पिकलबॉलच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Bingo!ची वचनबद्धता या भागीदारीतून अधोरेखित होते.
ITC फूड्सचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग हेड (स्नॅक्स, नूडल्स आणि पास्ता) श्री. सुरेश चंद, ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अरविंद प्रभू, तसेच सेलिब्रिटी पाहुणे मंदिरा बेदी आणि नायरा बॅनर्जी यांच्या उपस्थितीत ‘Bingo! वर्ल्ड पिकलबॉल चॅम्पियनशिप’चा प्रारंभ झाला.
84 देशांमध्ये 50 लाखांहून अधिक खेळाडू आणि 40% महिलांचा सहभाग असलेल्या पिकलबॉलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात गेल्या तीन वर्षांत हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 275% ने वाढली आहे आणि 2028 पर्यंत ही संख्या 10 लाखांहून जास्त होण्याचा अंदाज आहे. ‘Bingo!’ च्या प्रायोजकत्वामुळे या ट्रेंडला वेग मिळेल. 23 राज्यांमध्ये महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करून हजारो विद्यार्थ्यांना पिकलबॉलशी जोडले जाईल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी नवे खेळाडू तयार होतील.
‘Bingo! ‘ने नेहमीच स्नॅकिंग उद्योगात नवकल्पनांना प्रोत्साहन दिले आहे. त्याचप्रमाणे, पिकलबॉलचा जलदगती खेळ आणि वाढती लोकप्रियता यामुळे हा खेळ Bingo! साठी एक आदर्श भागीदार ठरतो. मजेशीर क्षण म्हणजेच ‘बोइंग!’ क्षण ‘Bingo!’च्या सुरुवातीपासूनच केंद्रस्थानी आहेत आणि आता हेच क्षण पिकलबॉल खेळात समाविष्ट होत आहेत. या सहकार्याचा एक भाग म्हणून, पारंपरिक ‘लव्ह ऑल’ पासून सुरू होणाऱ्या पिकलबॉल सामन्यांची सुरुवात आता Bingo!च्या खास ‘बोइंग ऑल’ पद्धतीने होईल. त्यामुळे या रोमांचक खेळाला एक मजेशीर वळण मिळेल.
या सहकार्याबाबत ITC फूड्सचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग हेड (स्नॅक्स, नूडल्स आणि पास्ता) श्री. सुरेश चंद म्हणाले, “क्रीडा आणि नवकल्पना हातात हात घालून पुढे जातात, अशी ‘Bingo’ची धारणा आहे. त्यामुळे ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनसोबतची ही भागीदारी आमच्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. यामुळे देशभरातील तरुण खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना समर्थन देण्याची संधी आम्हाला मिळते. पिकलबॉलसाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी आणि तळागाळाच्या पातळीवरील उपक्रम, महाविद्यालयीन स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रचाराद्वारे या खेळाचा प्रसार करण्यासाठी आम्ही AIPA सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत.”
ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू म्हणाले, “लाखो भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या Bingo! स्नॅक्ससारख्या ब्रँडसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही भागीदारी पिकलबॉलला भारतीय क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी आणण्यासाठी महत्त्वाची ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. या सहकार्याद्वारे पिकलबॉल प्रत्येकासाठी म्हणजेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते उदयोन्मुख व्यावसायिक खेळाडूंसाठी सुलभ असेल, अशी आम्हाला आशा आहे. Bingo!ची व्याप्ती आणि ब्रँडच्या उत्साही उपस्थितीच्या जोरावर या भागीदारीमुळे पिकलबॉलला घराघरात पोहोचवण्याचे आणि भारताला जागतिक पिकलबॉल क्षेत्रातील एक अग्रगण्य देश म्हणून स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.”
ग्रुपएम, दक्षिण आशियाच्या कंटेंट, एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत कर्णिक म्हणाले, “Bingo! आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन यांच्यातील पाच वर्षांची भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. पिकलबॉलचा देशभर विस्तार आणि खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या ‘Bingo!’च्या प्रयत्नांना ही भागीदारी नक्कीच नवी दिशा देईल. या सहकार्यातून, हा खेळ विस्तारण्याची आणि पुढील पिढीला प्रेरणा देण्याची प्रतिबद्धता दिसून येते. यामुळे तरुण खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी आव्हाने पेलण्याची प्रेरणा मिळेल. पिकलबॉलला घराघरात पोहोचवून या खेळाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
Bingo! आणि AIPA यांच्यातील या धोरणात्मक भागीदारीमुळे भारतातील पिकलबॉलच्या वाटचालीला नवी दिशा मिळेल. Bingo!च्या नाविन्यपूर्ण ब्रँड ओळखीसोबत पिकलबॉलच्या रोमांचक खेळाची सांगड घालून खेळाडूंच्या नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा आणि निरोगी, सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा या भागीदारीचा उद्देश आहे.