• सेंट झेव्हियर्स चे ४६० हून अधिक इंटर्न्स ई वेस्ट जागरुकता कार्यक्रमाचे करणार नेतृत्व
• हे इंटर्न्स मुंबई शहरातील ३० हून अधिक शाळांमध्ये जाऊन तरुण पिढीला शाश्वत विकासा विषयी जागरुकता निर्माण करणार
NHI NEWS AGENCY/REPORTER/ANAGHA SAKPAL
मुंबई, : ओप्पो इंडिया, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) यांच्या भागीदारीत, आपल्या ‘जनरेशन ग्रीन’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करून, देशभरातील इलेक्ट्रॉनिक कचरा जनजागृती अभियान (e-waste) सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (एम्पावर्ड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट) येथे सुरू केला आहे. यामुळे आता या उपक्रमाअंतर्गत हे कॉलेज ‘इको कॉन्शियस चॅम्पियन इन्स्टिट्यूट’ बनणार आहे. 1400 पेक्षा जास्त संस्थांमधून 9000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या इंटर्नशिप्ससाठी अर्ज केला आणि त्यातून 5000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हे विद्यार्थी आता जागरूकता सत्रे, ई-सर्वेक्षण, ग्रीन डे सेलिब्रेशन सारख्या प्रत्यक्ष शाश्वत क्रियाकलापांत गुंतले आहेत.
दुसरा टप्पा तरुणांना फेकून दिलेल्या वायर्स, मोबाइल फोन्स, चार्जर्स, बॅटरीज वगैरे इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या वाढत्या समस्येची समज देतो आणि शाश्वत भविष्यासाठी या कचऱ्याच्या प्रभावी निकालाचे महत्त्व समजावतो.
धारावी पुर्नविकास प्रकल्पाचे अतिरिक्त सचिव आणि सीईओ –आयएएस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण म्हणून उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेज चे मुख्याध्यापक डॉ. राजेंद्र शिंदे आणि ओपो इंडिया च्या पब्लिक अफेअर्सचे प्रमुख श्री राकेश भारद्वाज यांचा समावेश आहे. मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेज चे विद्यार्थी आणि असपासच्या शैक्षणिक संस्थांमधील मुले आता विविध कलात्मक कामे जसे नुक्कड नाटक, फ्रीस्टाईल रॅप आणि बीटबॉक्सिंग, कविता पठण आणि पोस्टर तयार करण्याची स्पर्धा या माध्यमातून ई वेस्टच्या जबाबदार वापरा बाबत जागरुकता निर्माण करणार आहेत.
धारावी पुर्नविकास प्रकल्पाचे अतिरिक्त सचिव आणि सीईओ- आयएएस श्री. एस व्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले “इलेक्ट्रॉनिक कचर्याचे व्यवस्थापन करणे हे एक पर्यावरणीय आव्हान आहे, विशेषकरुन मुंबई सारख्या शहरात ते मोठे आव्हान असते. ओपो इंडिया च्या जनरेशन ग्रीन सारख्या उपक्रमामुळे कचरा शाश्वतपणे नष्ट करण्याच्या गोष्टीमुळे बदलाचे दूत असलेल्या तरुणाईला आम्ही सक्षम करत आहोत.”
अवघ्या एक महिन्यात, शाळा-कॉलेजातील 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऊर्जेचा वापर कमी करण्याचा आणि जबाबदारीपूर्वक ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्धार केला आहे आणि अशा प्रकारे अधिक शाश्वत जीवनशैलीसाठी ते योगदान देत आहेत. वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत कमीत कमी 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे या प्रोग्रामचे ध्येय आहे.
ओपो इंडिया च्या पब्लिक अफेअर्स चे प्रमुख श्री. राकेश भारद्वाज यांनी सांगितले “ ओपो इंडिया मध्ये आम्ही नेहमीच भारत सरकारच्या नेट झिरो दृष्टिकोनाला सहकार्य करण्यास वचनबध्द आहोत. २ लाखांहून अधिक हरीत शपथा घेतल्या गेल्या आहेत, यांतून पर्यावरणस्नेही जीवनाविषयीची वचनबध्दता दिसून येते. आता या ४६०+ सेंट झेव्हियर्स च्या इंटर्न्स च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना हरीत कृती करण्यासह ई वेस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रोत्साहीत करत आहोत.”
युनाइटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD) अहवालानुसार, 2010 ते 2022 या वर्षांमध्ये स्क्रीन, कम्प्युटर आणि लहान-सहान IT आणि टेलीकम्युनिकेशन उपकरणांपासून (SCSIT) इलेक्ट्रॉनिक कचरा उत्पन्न करण्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारत 163 टक्के वृद्धीसह सर्वात पुढे आहे. यावरून हे आव्हान किती मोठे आहे आणि आणि त्यासाठी परिणामकारक ई-कचरा व्यवस्थापनाची किती गरज आहे, ते दिसून येते.
मुंबई च्या सेंट झेव्हियर्स कॉलेज चे मुख्याध्यापक डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले “ओपो इंडियाच्या जनरेशन ग्रीन मोहिमेसाठीची आमची ही भागीदारी शाश्वत विकासाच्या दृष्टिने टाकलेले एक उत्तम पाऊल आहे. आम्ही आमचे इंटर्न्स आणि भागीदार शाळांसह एनजीओज मुळे जागरुकता वाढीस लागेल. ग्रीन प्रॅक्टिसेस वरील वाढते लक्ष ठेऊन आम्ही तरुणाईल शाश्वत विकासाचे नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.”
येत्या काही आठवड्यांत, ही ई-कचरा जागरूकता चळवळ सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई, अमिटी युनिव्हर्सिटी, झारखंड, सिल्व्हर ओक युनिव्हर्सिटी, अहमदाबाद, दयानंद सागर युनिव्हर्सिटी, बंगळूर SRM युनिव्हर्सिटी दिल्ली-NCR, सोनेपत, JECRC युनिव्हर्सिटी, जयपूर वगैरे सारख्या मोठ्या संस्थांमध्ये पोहोचेल. विद्यार्थी, शिक्षक आणि आसपासच्या संस्थांना सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड (CPCB) द्वारे अधिकृत करण्यात आलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून ई-कचरा गोळा करण्यासाठी आणि जबाबदारीपूर्वक त्याचा निकाल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना शाश्वतता इंटर्न्स म्हणून घेण्यात येईल, जे कॅम्पस अॅम्बेसेडर म्हणून शाश्वत पद्धतींचा प्रचार करतील.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 एक नवीन शाश्वतता रॅंकिंग श्रेणी दाखल करणार आहे, ज्यामध्ये पर्यावरणीय शाश्वतता, ऊर्जा कार्यक्षमता आणि हरित कॅम्पस उपक्रम या निकषांवर संस्थांचे मूल्यांकन करण्यात येईल. हे जनरेशन ग्रीन अभियान संस्थांना त्यांचे शाश्वततेचे प्रयत्न वाढवण्यासाठी मदत करते.