NHI NEWS AGENCY/ REPORTER ANAGHA SAKPAL
“राष्ट्रीय बीपी स्क्रीनिंग दिवस” म्हणून सादर करण्याची घोषणा
ग्लेनमार्ककडून वयाच्या १८व्या वर्षापासून घरामध्ये रक्तदाब निरीक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे देशव्यापी मोहिमेची सुरुवात
मुंबई, २७ सप्टेंबर २०२४: हृदयविकार व्यवस्थापनातील कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) आज गेटवे ऑफ इंडिया येथे “टेक चार्ज @18” ही हायपरटेन्शन जागरूकता मोहीम सुरू केली. लवकर म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षांपासूनच रक्तदाबाचे निरीक्षण करण्याचे महत्त्व पटवून देणे यावर या उपक्रमाचा भर आहे.
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियातर्फे (API) प्रत्येक महिन्याची १८ तारीख “टेक चार्ज @18 – बीपी स्क्रीनिंग दिवस” म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यायोगे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी सर्व प्रौढांनी नियमित रक्तदाब तपासणी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ग्लेनमार्क आणि API यांच्या या सहयोगातून हायपरटेन्शन जनजागृती आणि निदान वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
गेटवे ऑफ इंडियावर या मोहिमेचे उद्घाटन दोन तासांच्या लक्षणीय 3D व्हिडीओ प्रक्षेपणाने झाले. त्यामध्ये प्रारंभिक रक्तदाब निरीक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे दर्शविले गेले. हायपरटेन्शनसंदर्भात जनजागृती आणि जनप्रबोधन करण्याची या मोहिमेची बांधिलकी जपत हे नाविन्यपूर्ण सादरीकरण लोकांना कृती करायला प्रवृत्त करणारे शक्तिशाली साधन बनले. विविध प्लॅटफॉर्मवरुन एक लाखांहून अधिक वैद्यकीय व्यवसायिकांपर्यंत पोहोचत या प्रभावी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ग्लेनमार्कने या उपक्रमाच्या माध्यमातून १० कोटी भारतीयांना हायपरटेन्शनबद्दल जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ही मोहिम रक्तदाब निरीक्षणाला कोणत्या वयात सुरुवात करावी, योग्य वय कोणते असावे याबद्दलच्या जागरूकतेविषयी असलेली महत्त्वाची दूरी भरून काढते. सध्या अनेक तरुण प्रौढ हायपरटेन्शन आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या त्याच्या जीवघेण्या गुंतागुंतीच्या धोक्यांना सामोरे जात आहेत. भारतीय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा धोका वाढला आहे.
ग्लेनमार्कच्या व्यापक दृष्टिकोनात सुमारे १,००,००० वैद्यकीय व्यावसायिकांना प्रारंभिक रक्तदाब तपासणीच्या महत्त्वावर प्रशिक्षण देण्याचा समावेश आहे. या मोहिमेने काही उल्लेखनीय टप्पे गाठले असून त्यात पुढील काही गोष्टी समाविष्ट आहेत:
५० युवा जागरूकता कार्यक्रम: प्रारंभिक रक्तदाब निरीक्षण करण्याच्या महत्त्वावर जोर देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे.
डिजिटल पोहोच: bpincontrol.com ही वेबसाइट, सोशल मीडिया आणि इनफ्लुएन्सर सहयोगाद्वारे १० दशलक्षांहून अधिक लोकांना यात सहभागी करून घेणे
00+ हायपरटेन्शन जनजागृती रॅली: जागतिक हायपरटेन्शन महिना आणि जागतिक हृदय महिन्यांच्या अनुषंगाने देशभरात आयोजन.
या मोहिमेबद्दल बोलताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या इंडिया फॉर्म्युलेशनचे अध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. अलोक मलिक म्हणाले, “ग्लेनमार्कमध्ये आम्ही भारतातील हायपरटेन्शन विरुद्धच्या लढाईत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अर्थपूर्ण परिणाम साध्य करण्यासाठी दृढ बांधिल आहोत. विशेषतः तरुणांमध्ये हायपरटेन्शनच्या त्रासाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, सुरुवातीच्या वयापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही मोहिम लोकांचे प्रबोधन करण्यावर आणि त्यांच्या रक्तदाबाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करते. लवकर निदान आणि उपचार झाले तर भविष्यातील आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात आणि जीवनमान उंचावू शकते. व्यापक जनजागृती प्रयत्नांद्वारे, आम्ही भारतातील आरोग्य सेवा पद्धतींमध्ये हायपरटेन्शन विषयक जनजागृतीला अग्रस्थानी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
हा उपक्रम अलीकडील ICMR अभ्यासातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सुरू करण्यात आला आहे. त्यात २० वर्षे वय आणि त्यावरील भारतीयांमध्ये हायपरटेन्शनचे 35.5% प्रमाण दर्शविले आहे. विशेषतः शहरी लोकसंख्येमध्ये हेच प्रमाण 40.7% इतके दिसून आले आहे. 2025 पर्यंत उच्च रक्तदाबाचे प्रमाण 25% ने कमी करणे हे भारताचे एक राष्ट्रीय आरोग्य लक्ष्य आहे. ग्लेनमार्कची मोहिम म्हणजे व्यापक जागरूकता आणि सक्रिय आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देऊन या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.