NHI NEWS AGENCY /REPORTER/ ANAGHA
मुंबई : माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लब-शिवाजी पार्क व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅरम स्पर्धेत शालेय-कॉलेजमधील ज्युनियर ३२ खेळाडूंमध्ये अजिंक्यपदाचा माहीम ज्युवेनील चषक पटकाविण्यासाठी चुरस होईल. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शालेय ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कॅरम स्पर्धा होत असून पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विजय येवलेकर व उपाध्यक्ष विकास खानोलकर यांच्या हस्ते आकर्षक १६ पुरस्कारासह स्ट्रायकरद्वारे गौरविण्यात येणार आहे. माहीम जुवेनील पव्हेलीयन, शिवाजी पार्क येथे ही विनाशुल्क कॅरम स्पर्धा रंगणार आहे.
शालेय-महाविद्यालयीन मुख्य कॅरम स्पर्धेअगोदर स्पर्धात्मक सरावात विजेतेपद पटकाविण्यासाठी आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, रुपारेल कॉलेजचा कुणाल जाधव, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे, एमडी कॉलेजचा साम्यक पवार, ठाकूर रामनारायण स्कूल-दहिसरचा तीर्थ ठाकर, इन्फंट जेसस स्कूल-अंबरनाथचा ओमकार चव्हाण, लव्ह ग्रोव्ह एमपीएसचा सिद्धांत मोरे, वरळी सीफेस म्युनिसिपल स्कूलचा रेहान शेख, नारायण गुरु स्कूल-चेंबूरचा उमेर पठाण, जन गण मन कॉलेज-कोपरचा अथर्व म्हात्रे, पोद्दार अकॅडमी हायस्कूल-मालाडचे पुष्कर गोळे व प्रसन्ना गोळे आदी उत्सुक आहेत. परिणामी दादरकरांना दर्जेदार लढती पाहण्यास मिळतील. श्रीशान पालवणकर वि. बालाजी काठूरोजीगारी आणि पृथ्वी बडेकर वि. शुभम परमार यामधील उदघाटनीय लढती एमजेएससीचे सेक्रेटरी सुनील पाटील, खजिनदार महेश शेट्ये व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत.
******************************