NHI NEWS AGENCY /ANAGHA SAKPAL
भारतातील एकमेव वितरक म्हणून व्यवसाय करणार
मुंबई 21 सप्टेंबर 2024: भारतात इवेंट मार्केटिंग सेवा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ट्रिझी इनोव्हेशन्झ ने काल मुंबईत एका समारंभात होलोकनेक्ट्स या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित होलोग्राफ सेवा व्यवसायातील आघाडीच्या डच तंत्रज्ञान कंपनीच्या भागीदारीत अत्याधुनिक होलोबॉक्स सादर केला.
ही धोरणात्मक भागीदारी म्हणजे होलोग्राफिक डिस्प्ले सेवांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून भारतातील मार्केटिंग क्षेत्राचा कायापालट घडवून आणण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. या समारंभात ट्रिझी इनोव्हेशन्झ होलोबॉक्स चे भारतातील एकमेव वितरक म्हणून नेमण्यात आल्याचे होलोकनेक्ट्स तर्फे जाहीर करण्यात आले.
होलोबॉक्स हे होलोकनेक्ट्स चे अग्रेसर उत्पादन म्हणजे क्रांतिकारी होलोग्राफिक डिस्प्ले प्रणाली असून तिचा वापर केल्यास थ्री डी दृश्ये पाहण्यासाठी वेगळ्या चषम्यांची आवशयकता लागत नाही. सुबक रचना असलेला आणि वापरण्यास सोपा होलोबॉक्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच उत्पादनांची प्रात्यक्षिके, ग्राहक सहभागासह जाहिरात मोहिमा आणि अनुभवाधारित मार्केटिंग या साठीच्या नव्या पद्धती स्थापित करील. होलोबॉक्स आणि होलोबॉक्स मिनी ही दोन्ही उपकरणे ‘प्लग अँड प्ले’ तत्वावर चालतात, वापरायला अत्यंत सोपी असतात आणि ती चालविण्यासाठी वीज आणि इंटरनेट जोडणी एवढीच आवश्यकता असते.
होलोबॉक्स चे भारतातील एकमेव वितरक या भूमिकेतून ट्रिझी इनोव्हेशन्झ भारतीय व्यवसायांना होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता आत्मसात करण्याची संधी देईल. कंपनीचे विस्तृत वितरण जाळे आणि भारतीय बाजारपेठेची उत्तम समज याला होलोकनेक्ट्स च्या होलोग्राफिक्स क्षेत्रातील नवनवीन उत्पादनांची जोड मिळाल्यामुळे विविध उद्योगांमधील मार्केटिंग व्यावसायिकाना अनेक नव्या कल्पना विकसित करणे शक्य होईल.
ट्रिझी इनोव्हेशन्झ चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चैतन्य बगई म्हणाले, “होलोबॉक्स भारतात सादर करताना आम्हाला अत्यंत हर्ष होत आहे. यातील थ्री डी तंत्रज्ञान क्रांतिकारी आहे आणि थेट प्रक्षेपण क्षमता अजोड आहे. होलोकनेक्ट्स बरोबरच्या आमच्या भागीदारीच्या माध्यमातून आधी कधीही शक्य न झालेल्या पद्धतीने ग्राहकाचा सहभाग निश्चित करून त्याला सखोल अनुभव प्राप्त करून देता येईल.”
हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा आनंद व्यक्त करताना होलोकनेक्ट्स चे हह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एंड्री स्मिथ म्हणाले, ” ट्रिझी एक्स बरोबरची ‘एक्स्क्ल्यूझिव’ स्वरूपाची भागीदारी ही आमच्यासाठी एक ‘थ्रिलिंग’ घटना आहे. आमचा सतत नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा आणि समाजाची प्रगती घडविण्याचा दृष्टिकोन हे आम्हा भागीदार कंपन्यांमधील समान सूत्र आहे. एकत्र काम करून होलोबॉक्स तंत्रज्ञानाची शक्ती भारतात आणणे, व्यावसायिक संबंध जोडणे आणि दृढ करणे, संवाद वाढविणे आणि येथील उद्योगांना उच्च प्रतीच्या कामगिरीसाठी सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ”
पदार्पण समारंभात होलोबॉक्सचा बहुआयामी वापर आणि रिटेल, वाहन निर्मिती, शिक्षण आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील प्रभावी वापर याचे दर्शन घडविण्यात आले. उपस्थित अतिथीनी होलोग्राफिक दृश्यांचे माध्यम वापरुन उत्पादनाचे सादरीकरण कसे उठावदार करता येते याचा अनुभव घेतला. या वेळी उपस्थितांना इंटर अॅक्टिव झोन उपलब्ध करून दिला होता जेथे फोटो घेण्याची सुविधा होती आणि होलोबॉक्स प्रक्षेपणाचे प्रात्यक्षिक होते.
होलोबॉक्स चा वापर करून भारतीय उत्पादनांचे विविध ब्रॅंड मार्केटिंग प्रणालींच्या गर्दीतून मार्ग काढत अपेक्षित ग्राहक समुदायांशी थेट संपर्कात येतील आणि मार्केटिंग च्या संपूर्ण परिघात एक क्रांति घडेल अशा उद्देशाने हे उपकरण भारतात सादर करण्यात आले आहे. त्याच्या उपयोगाच्या शक्यता अमर्याद आहेत. इन स्टोअर प्रदर्शन, आभासी वातावरण निर्माण करून उत्पादन सादर करणे, ग्राहकाला प्रत्यक्ष अनुभव घेणे शक्य करणे, व्यापारी प्रदर्शने, शैक्षणिक विषयांवरील सादरीकरण अशा अनेक उद्दिष्टांसाठी त्याचा मोठा उपयोग होईल.
जुन्या पद्धतींना फाटा देत नवे पर्याय देणारे तंत्रज्ञान आणि मार्केटिंग क्षेत्रात कायापालट घडवून आणण्याची क्षमता यामुळे होलोबॉक्स भारतीय मार्केटिंग मधील गेम चेंजर ठरणार आहे.
ट्रिझी इनोव्हेशन्झ विषयी :
2008 मध्ये स्थापन झाल्यापासून आज आम्ही भारतातील सर्वात लोकप्रिय इवेंट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहोत. या 16 वर्षांच्या अनुभवाच्या आधारे आम्ही प्रत्येक इवेंट अथक उत्साहाने पूर्ण करण्याची हमी देऊ शकतो. ट्रिझी ही ‘फुल सर्विस’ इवेंट मॅनेजमेंट कंपनी असून नियोजन, सल्ला आणि सुपरव्हिजन या सेवा कॉर्पोरेट तसेच सामाजिक इवेंट साठी उपलब्ध करतो. प्रत्येक ग्राहकाची अभिरुचि आणि अपेक्षा लक्षात घेऊन आम्ही खास कल्पकता आणि कौशल्ये वापरुन इवेंट निर्मिती करतो. इवेंट कॉर्पोरेट असो किंवा सामाजिक, ट्रिझी थीम, डिझाईन ले आऊट, इवेंट फॉरमॅट आणि सजावट यांच्या मिलाफातून आम्ही घडविलेले इवेंट अत्यंत सुंदर, खास, आणि संसमरणीय ठरतात. ट्रिझी इनोव्हेशन्झ विषयी आणखी जाणून घेण्यासाठी लिंक्ड इन किंवा https://www.trzy.in/ येथे भेट द्या.
ट्रिझी X विषयी:
आम्ही ग्राहकांना स्मार्ट, एकात्मिक तंत्रज्ञांना बरोबरच वैयक्तिक लक्ष देऊन सेवा पुरवत असल्यामुळे आमच्या ग्राहकांचे इवेंट इतरांपेक्षा खूपच वेगळे असतात. प्रत्येक इवेंट साठी तुमच्या ब्रॅंड ला पोषक असे खास प्रसिद्धी उपक्रम आम्ही तयार करतो – यातूनच एक खराखुरा सलग अनुभव मिळतो. पारंपरिक मार्केटिंग मध्ये नवा विचार आणत आणि त्याची नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत आम्ही सर्वोत्कृष्ट आणि नावीन्यपूर्ण कल्पना ग्राहकांसाठी तयार करतो. आकर्षक तंत्रज्ञान विषयक इवेंट आणि एरियल बॅनर, ड्रोन शो, खास ब्लिंप्स स्काय रायटिंग, पारदर्शी एलइडी स्क्रीन, थ्री डी प्रोजेक्शन मॅपिंग, जेट सूट पायलट, होलोग्राफिक एक्स्पिरियन्स, फ्लाइंग एलइडी स्क्रीन, RFID ब्रेस्लेट्स, पी व्ही सी रिस्टबॅंड स्काय डायव्हिंग पोस्टर रिव्हील, थ्री डी बिलबोर्ड या आणि अशा अनेक बाबतीत ट्रिझी X ची खासियत आहे.
होलोकनेक्ट्स विषयी:
होलोकनेक्ट्स ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित होलोग्राफिक तंत्रज्ञान सेवा देणारी एक अग्रेसर टेक्नॉलॉजी कंपनी आहे. या व्यवसायातील तज्ज्ञांची टीम आणि नवनिर्मिती ची बांधिलकी या ताकदीवर होलोकनेक्ट्स विविध उद्योगांचे रूप पालटणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरणारी सेवा देण्यावर भर दिला आहे. होलोकनेक्ट्स चे होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरुन उद्योगांना त्यांच्या ग्राहकांशी संपर्क साधता येतो, ब्रॅंडिंग ला उठाव देता येतो आणि कामकाजात कार्यक्षमता आणता येते. होलोकनेक्ट्स ही 2020 मध्ये स्थापन झालेली खाजगी कंपनी असून तिचे मुख्यालय नेदरलँड मधील कुलेम्बर्ग येथे आहे. होलोकनेक्ट्स विषयी अधिक माहितीसाठी लिंक्ड इन किंवा https://Holoconnects.com येथे भेट द्या.