NHI-NEWS AGENCY/ANAGHA SAKPAL
व्हॉट्सॲपवर अधिक अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी व्यवसायांना नवीन मार्ग सादर
- आम्ही ग्राहकांसोबत कनेक्ट होण्यासाठी आणि अधिक टास्क्स करण्यासाठी व्यवसायांना मॅसेजिंगचा वापर करण्यास मदत करण्याकरिता भारतात आमच्या पहिल्या व्हॉट्सॲप बिझनेस समिटचे आयोजन केले
- नवीन वैशिष्ट्ये व प्रोग्राम्ससह आम्ही भारतातील लघु व्यवसायांच्या विकासाला पाठिंबा देण्याप्रती आमची कटिबद्धता दृढ केली आहे
- आगामी व्यस्त सणासुदीच्या काळात लोकांसोबत अर्थपूर्ण व बहुमूल्य संबंध निर्माण करण्याकरिता व्यवसायांसाठी सर्वोत्तम पद्धती सादर
मुंबई, : भारतातील आमच्या पहिल्या व्हॉट्सॲप बिझनेस समिटमध्ये आम्ही विविध वैशिष्ट्ये आणि अपडेट्सची घोषणा केली, जे देशभरातील व्यवसायांना उपस्थिती दर्शवण्यासोबत त्यांच्या ग्राहकांकरिता उत्तम इन-चॅट अनुभवांची निर्मिती करण्यासाठी आणि आगामी सणासुदीच्या काळापूर्वी कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मदत होईल.
या समिटबाबत मत व्यक्त भारतातील मेटाच्या उपाध्यक्ष संध्या देवनाथन म्हणाल्या, ”सर्वव्यापकता व सुलभता व्हॉट्सअॅपला भारतातील परिवर्तनाचे मुख्य सेंटर बनवतात, जे व्यवसायांना लक्षवेधक संकल्पना आणि विकासाच्या नवीन मॉडेल्सना चालना देण्यास मदत करत आहे. आज आम्ही घोषणा करत असलेली ही वैशिष्ट्ये आणि प्रोग्राम्समधून व्यवसायांना डॉलरप्रमाणे त्यांचे मूल्य वाढवण्यास मदत करण्याप्रती, तसेच व्हॉट्सॲप वर अपवादात्मक ग्राहक अनुभव देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
व्हॉट्सॲपवर सर्व लघु व्यवसायांसाठी मेटा व्हेरिफाइड सादर
भारतातील लाखो लघु व्यवसाय व्हॉट्सॲप बिझनेस ॲपचा वापर करतात. ते वारंवार आम्हाला सांगत आहेत की त्यांची इतरांपेक्षा वरचढ असण्याची आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. आता, मेटा व्हेरिफाइड व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपचा वापर करणाऱ्या भारतातील सर्व पात्र लघु व्यवसायांसाठी उपलब्ध आहे. मेटा व्हेरिफाइडसह सबस्क्राईब करण्यासोबत प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या व्यवासायांना सत्यापित बॅज, तोतयागिरीपासून संरक्षण, अकाऊंट सपोर्ट आणि प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतील, ज्यामुळे त्यांना त्यांचा ब्रँड ऑनलाइन प्रगत करण्यास आणि ग्राहकांसोबत चॅट करण्यासाठी अधिक कार्यक्षम करण्यास मदत होईल. हाच बॅज त्यांचे व्हॉट्सॲप चॅनेल्स व बिझनेस पेजेसवर दिसेल, ज्यामुळे सोशल मीडिया व वेबसाइट्सवर सहजपणे शेअर करता येईल.
व्हॉट्सॲप बिझनेस ॲपवर कस्टमाइज्ड मेसेजेस्
आम्ही आजपासून भारतातील व्हॉट्सॲप बिझनेस ॲपचा वापर करणाऱ्या लघु व्यवसायांसाठी क्षमता सादर करत आहोत, ज्यामुळे ते त्यांच्या ग्राहकांना अपॉइण्टमेंट रिमाइंडर्स, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा हॉलिडे सेलबाबत अपडेट्स असे कस्टमाइज्ड मेसेजेस् जलदपणे आणि अधिक कार्यक्षमपणे पाठवू शकतील. मोफत उपलब्ध असलेले हे नवीन वैशिष्ट्य व्यवसायांना ग्राहकांच्या नावासह वैयक्तिक मेसेजेस् व सानुकूल कॉल-टू-ॲक्शन बटन्स पाठवण्याची क्षमता देते. तसेच हे नवीन वैशिष्ट्य त्यांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेजेसचा दिवस व वेळ ठरवण्यास सक्षम करेल.
व्हॉट्सॲप भारत यात्रा
लघु व्यवसायांना विकास व प्रगती करण्यासाठी व्हॉट्सॲपची गरज माहित असली तरी त्यांच्यापैकी बहुतांश लघु व्यवसाय अॅपची खरी क्षमता वाढवण्याबाबत जाणून घेत उच्च मूल्य प्राप्त करू शकतात. व्हॉट्सअॅपसाठी अद्वितीय उपक्रमामध्ये आम्ही लवकरच भारतात व्हॉट्सअॅप बिझनेस यात्रा लाँच करणार आहोत, जेथे आम्ही भारतातील विविध द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये जाऊन लघु व्यवसायांना प्रत्यक्षात, वैयक्तिक प्रशिक्षण देऊ. आमचा विश्वास आहे की, योग्य डिजिटल कौशल्ये असलेले लघु व्यवसाय भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात. म्हणून, या उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही लघु व्यवसायांना त्यांचे व्हॉट्सॲप बिझनेस अकाऊंट्स स्थापित करण्याचे, कॅटलॉग्ज निर्माण करण्याचे, व्हॉट्सॲपवर क्लिक केल्या जाणाऱ्या जाहिराती सेट अप करण्याचे प्रशिक्षण देऊ. आम्ही आमच्या वेबसाइटवर रिसोर्स सेंटर देखील निर्माण करू, जे या व्यवसायांसाठी क्विक-अॅक्सेस ट्यूटोरिअल सेंटर म्हणून सेवा देईल.
व्यवसायांसाठी सर्वोत्तम पद्धती
व्यक्तींची इतर चॅनेल्सप्रमाणे त्यांचे व्हॉट्सॲप ओव्हरलोड न होण्याची इच्छा आहे, ज्यामुळे त्यांची काळजी करणारे आणि मत जाणून घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती व व्यवसायांकडून येणारे महत्त्वाचे मेसेजेस् ते चुकतात. म्हणून, आम्ही व्यवसायांना व्यक्तींसोबत अर्थपूर्ण व बहुमूल्य संबंध निर्माण करण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यवसाय कस्टम फ्लो निर्माण करत असतील किंवा हॉलिडे सेलसाठी मेसेजिंग मोहिम राबवत असतील त्यांनी व्हॉट्सअॅपवर यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे:
- ग्राहकांना हवे असलेले मेसेजेस् पाठवा आणि पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या मेसेजसाठी ग्राहकांची परवानगी घ्या – मग डिलिव्हरीसंदर्भात वेळेवर अपडेट असो किंवा हॉलिडे सेलसाठी कूपन असो.
- ग्राहकांना कधी व कोणते मेसेजेस् पाठवले गेले आहेत याबाबत काळजी घ्या – विषयाचा गाभा किंवा पुनरावलोकन मजकूरामधून मूळ संदेश स्पष्ट होत असल्याची खात्री घ्या आणि संदेश केव्हा पाठवला पाहिजे याबाबत विचार करा. ग्राहक तुमचे मत ऐकण्यासाठी कदाचित सायंकाळची वेळ योग्य नसेल.
- काय उपयुक्त ठरत आहे आणि काय नाही हे ठरवण्यासाठी आकडेवारीचा उपयोग करा – आम्ही व्यवसायांना मुलभूत माहिती देतो, जसे रीड रेट्स, ज्यामुळे ते काय उपयुक्त ठरत आहे आणि काय नाही हे पाहू शकतात. यामुळे ओव्हरलोड टाळण्याकरिता ग्राहकांना मेसेज करण्यासाठी योग्य वारंवारता निर्धारित करण्यास मदत होऊ शकते.
- ग्राहकांचे मत जाणून घ्या – अजूनही चांगले काहीतरी करता येऊ शकते, असे ग्राहक सांगतील. म्हणून ते व्यवसायांकडून सेल किंवा प्रमोशनबाबत ऐकण्यास उत्सुक असले तरी कदाचित दिवसातून किंवा आठवड्यातून वारंवार ऐकण्यास उत्सुक नसतील. म्हणून, आम्ही ॲपमध्ये योग्य टूल्स निर्माण करत आहोत, ज्यामुळे व्यक्ती त्यांना हवे असलेले विशिष्ट प्रकारचे मेसेजेस् आणि ते कितीवेळा मिळाले पाहिजे याबाबत अभिप्राय देऊ शकतात.
भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला असताना आम्हाला विश्वास आहे की, नवीन अपडेट्ससोबत सर्वोत्तम पद्धती व्यवसायांना त्यांची विक्री वाढवण्यासोबत विकासाला गती देण्यास सक्षम करतील. या नाविन्यपूर्ण सोल्यूशन्सचा फायदा घेत व्यवसाय या सणासुदीच्या काळाचा फायदा घेऊ शकतात आणि यशस्वी होण्यासाठी नवीन संधी अनलॉक करू शकतात.