ऑगस्ट २०२२ : लॅब ग्रोन डायमंड आणि आभूषणांचे ‘एलडीजेएस २०२२’ प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्ती आज येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे प्रदर्शन ५ ते ८ ऑगस्ट दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे सुरू राहणार आहे. “लॅब-ग्रोन डायमंड अँड ज्वेलरी प्रमोशन कौन्सिल (एलजीडीजेपीसी)”द्वारे आयोजित ‘एलडीजेएस २०२२’ प्रदर्शन हे भारतीय व आंतरराष्ट्रीय सराफ समुदायासाठी आयोजित देशातील सर्वात मोठा वार्षिक जलसा आहे.
तब्बल ५,००० चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या, ‘एलडीजेएस २०२२’ मध्ये १०० हून अधिक प्रदर्शक त्यांनी घडविलेल्या विविध प्रकारच्या हिरे व दागिन्यांचे प्रदर्शन करतील. या प्रतिष्ठित एक्स्पोला ४५ हजारांहून अधिक व्यापारी बंधू, प्रतिनिधी, खरेदीदार तसेच तितक्याच संख्येने भारत आणि परदेशातील सामान्य पाहुण्यांची उपस्थिती लाभणे अपेक्षित आहे.
‘एलडीजेएस’ची पहिली आवृत्ती प्रचंड यशस्वी ठरली आणि नेस्को, मुंबई येथे ४० हजार चौरस फुटांच्या क्षेत्रफळावर त्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘एलडीजेएस २०२२’ मध्ये १२ इंटरएक्टिव्ह ट्रेड सेशन्स आणि १२ फॅशन शोसह नऊ देश सहभागी होतील, ज्यामध्ये रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्ससह भारत आणि जगभरातील विविध उत्पादक आणि प्रदर्शकांकडून रचित विविध आभूषणे प्रदर्शित केली जातील.
लॅब ग्रोन डायमंड अँड ज्वेलरी प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष शशिकांत दलीचंद शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रॉयल थाई कॉन्सुलेट, मुंबई येथील वाणिज्यदूत महामहिम श्री. डोनाविट पूलसावत हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते, तर थाई ट्रेड सेंटरच्या कॉन्सुल आणि कार्यकारी संचालक श्रीमती सुपात्रा सवेंगश्री प्रमुख अतिथी होत्या.
इतर सन्माननीय पाहुण्यांमध्ये भरत शहा, अध्यक्ष – एमडीएमए, आशिष पेठे, अध्यक्ष – जीजेसी, मेहुल शहा, उपाध्यक्ष- बीडीबी, अतुल जोगानी, उपाध्यक्ष – टीजीटीए थायलंड, अशोक गजेरा, अध्यक्ष व व्यव. संचालक – लक्ष्मी डायमंड, प्रशांत मेहता, अध्यक्ष जेएबी, चेतन मेहता, उपाध्यक्ष – आयबीजेए, घनश्याम ढोलकिया, एचके ग्रुप, माजी खासदार नरसिंहन आणि इतर अनेकांचा सहभाग असेल.
एलडीजेएस २०२२ ला भारत डायमंड बोर्स, सूरत डायमंड बोर्स, द मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशन, द लॅब-ग्रोन डायमंड असोसिएशन – सुरत; आणि हीरा जवेरात (एचझेड) इंटरनॅशनल यांचे समर्थन आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना, लॅब ग्रोन डायमंड अँड ज्वेलरी प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष, श्री. शशिकांत दलीचंद शहा म्हणाले, “आज या प्रमुख प्रदर्शनाचे उद्घाटन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. केवळ लॅब ग्रोन हिरे व आभूषणांना प्रोत्साहनच नाही तर भारत आणि परदेशातील लॅब ग्रोन हिऱ्यांची विविध वैशिष्ट्ये, फायदे आणि फायद्यांबद्दल जागृती निर्माण करणे, गैरधारणांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि व्यापार आणि अंतिम ग्राहकांना शिक्षित करण्याचा परिषदेचा निरंतर प्रयत्न राहिला आहे. हा़ एक्स्पो जगासमोर या चमचमीत सौंदर्यांच्या निर्मितीमध्ये भारताचे कौशल्य, कारागिरी आणि कर्तृत्व दाखवेल. भारतातील उद्योग झपाट्याने वाढत आहे आणि जागतिक स्तरावर लॅब ग्रोन हिरे व दागिन्यांसाठी सर्वात मोठे आऊटसोर्सिंग हब म्हणून भारताचे स्थान असेल अशी वेळ समीप आली आहे.”