DEVOTIONAL
NHI NEWS AGENCY/REPORTER – ANAGHA SAKPAL
नवी मुंबई, ४ सप्टेंबर २०२४: रेमंड लिमिटेडचे अध्यक् आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी आज नवी मुंबईतील उळवे येथील श्री भगवान व्यंकटेश्वर मंदिरासाठीची पायाभरणी केली. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे कार्यकारी अधिकारी, आयएएस श्री. जे. श्यामला राव आणि TTD चे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, आयआरएस श्री. च व्यंकय्या चौधरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रेमंडने गेल्या वर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या सहयोगाने या मंदिराचा भूमिपूजन समारंभ यशस्वीपणे पार पाडला होता.
या समारंभात बोलताना गौतम सिंघानिया म्हणाले, “नवी मुंबईतील श्री भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी करणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा प्रकल्प या भागातील भाविकांसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या आत्यंतिक महत्त्वाचा आहे. हे मंदिर म्हणजे भारताच्या समृद्ध धार्मिक वारशाचे जतन आणि संगोपन करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. मंदिराच्या कामाची पूर्तता करायला आम्ही पूर्ण प्राधान्य देऊ आणि नजीकच्या भविष्यात ते पूजा, आराधना करण्यासाठी आणि समाजाने एकत्र येण्यासाठीचे आदर्श केंद्र बनेल हे सुनिश्चित करू.”
हे मंदिर महाराष्ट्र सरकारने दिलेल्या १० एकर जागेवर बांधले जाईल आणि या भागात एका महत्त्वपूर्ण आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्राची भर मिळेल. भारताच्या पश्चिम भागातील जे लोक आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराला भेट देऊ शकत नाहीत अशा भगवान व्यंकटेश्वर बालाजी यांच्या भक्तांची पूर्तता करण्यासाठी हे मंदिर तयार आहे. उळवे येथील हे स्थळ आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असून अशा प्रकारे व्यवहार्य स्थान म्हणून निवडले गेले आहे.